अक्राणी :- अक्राणी तालुक्यातील सामान्य जनतेच्या तक्रारी/अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडुन सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून तालुकास्तरावर लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजीत केला जात आहे.तरी अक्राणी तालुक्यतील सर्व सामान्य जनतेला आवाहन करण्यात येते की, कोणाची काही तक्रारी/अडचणी असल्यास तक्रारीच्या कागदपत्रासह तहसिल कार्यालय अक्राणी येथे, महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी वेळ सकाळी ११.०० वाजता तहसिल कार्यालय अक्राणी येथे उपस्थित राहण्याचे आवाहन ( ज्ञानेश्वर सपकाळे) तहसीलदार अक्राणी यांनी केले आहे.