मोराणे :- दि 04 फेब्रुवारी 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा व प्लेसमेंट सेल अंतर्गत प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली समर्पण मल्टी डिसॅबिलिटी रिहबिलिटेशन सेंटर च्या मदतीने कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २४ विद्यार्थी- विद्यार्थिनींनी मुलाखतीत सहभाग घेतला. मुलाखत घेण्यासाठी मा.प्रदीप शहा, मा.सचिन पिंगळे व कन्व्हेनर प्रा. डॉ. सुदाम राठोड हे उपस्थित होते. समर्पण मार्फत धुळे शहरातील कस्तुरबा रुग्णालय येथे, दिव्यांग मुला मुलींच्या व्यापक विकासासाठी चालवण्यात येणाऱ्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येणाऱ्यासाठी सल्ला, मार्गदर्शन, समुपदेशन व डेटा ऑपरेटिंग, इत्यादी कामे करावे लागणार आहेत. यासाठी संगणक ज्ञान व संवाद कौशल्य त्या आवश्यक तसेच सदरील कामांमध्ये परिपूर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे असे, प्रदीप शहा यांनी यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना संबोधन करताना सांगितले. सदरील कॅम्पस मुलाखतीचे आयोजन, व्यवस्थापन करणे करीता प्रा. डॉ. सुदाम राठोड यांनी परिश्रम घेतले.
मोराणे येथे कॅम्पस मुलाखत संपन्न
मोराणे प्रतिनिधी प्रकाश नाईक