एम. एस. डब्ल्यू द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचे सलग दुसऱ्यांदा बेस्ट क्लास अवॉर्ड

 मोराणे प्रतिनिधी प्रकाश नाईक

मोराणे :- समता शिक्षण संस्था पुणे, संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे, धुळे येथे, दि. 01 मार्च 2025 रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 त्यामध्ये वर्षभरातील विविध प्रकारचे कार्यक्रम, कार्यशाळा,व क्रीडा स्पर्धा मध्ये क्रिकेट, गोळा फेक, थाळी फेक, नेटबॉल, कबड्डी, व्हॉलीबॉल, इत्यादी खेडमध्ये यश मिळवले.

तसेच फॅन्सी ड्रेस, काव्यवाचन, मिमिक्री, स्टँड अप कॉमेडी, गीत गायन, मेहंदी, रांगोळी, पोस्टर, प्रदर्शन स्पर्धा, एकपात्री नाटक, ग्रुप डान्स, वर्ग सजावट, युवारंग, व इतर कला प्रकरांमध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवला आहे.

 या वर्षभरातील विविध प्रकारच्या कार्यक्रम स्पर्धांमध्ये एम एस डब्ल्यू भाग 2 या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी सर्वात जास्त सहभाग नोंदवून संपूर्ण वर्ग संघटित होऊन सलग दुसऱ्यांदा बेस्ट क्लास अवॉर्ड मिळवला आहे. 

 या सर्व कला प्रकारात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना  प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन  विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे प्राचार्य, मा. डॉ. जगदीश पाटील, प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ, व महाविद्यालयातील शिक्षक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याबद्दल  डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे, धुळे या महाविद्यालयाचे प्राचार्य, व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनी या सर्वांनी मिळून, एम. एस.डब्ल्यू द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना यशस्वी झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच पुढील भविष्याच्या  वाटचालीसाठी देखील शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. 

 कोणतेही यश सहज मिळत नाही तर, वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून व संघटित होऊन कार्य केलं तर यश नक्की मिळते. असाच प्रयत्न करत रहा असे महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. विष्णू गुंजाळ व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

 या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे प्राचार्य, मा. डॉ. जगदीश पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. विष्णू गुंजाळ, व शिक्षकेतर  कर्मचारी, एम. एस.डब्ल्यू. भाग एक दोन, बी. एस. डब्ल्यू प्रथम द्वितीय तृतीय वर्गातील  विद्यार्थी आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार