मोराणे प्रतिनिधी प्रकाश नाईक
मोराणे :-दि. 10 जानेवारी 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा व प्लेसमेंट सेल अंतर्गत बायोडेटा प्रेपरेशन कार्यशाळा संपन्न झाली. याप्रसंगी वरील मत व्यक्त केले. पुढे बोलताना प्राचार्य, डॉ. गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांच्या यशस्वी जीवनासाठी अनेक कौशल्य जसे की, संवाद कौशल्य, लेखन कौशल्य, सादरीकरण कौशल्य, संगणक कौशल्य, मुलाखत कौशल्य, इत्यादी आत्मसात होणे आवश्यक आहे, याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच स्पर्धेच्या जगात आपला विद्यार्थी अद्यावत राहावा या संदर्भात प्लेसमेंट सेल या विभागाने अत्यंत महत्त्वाचा विषय कार्यशाळेत घेतला याबाबत समाधान व्यक्त केले. कार्यशाळेच्या प्रास्ताविके मध्ये प्रा. डॉ. सुदाम राठोड यांनी सदरील कार्यशाळेचे उद्देश विशद केले. कार्यशाळेसाठी साधन व्यक्ति म्हणून महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. दिलीप घोंगडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना Resume, CV, Biodata याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आणि विद्यार्थ्यांना नोकरी संदर्भात उपलब्ध असलेल्या विविध वेबसाइट्स, व्यवस्था याबाबत ही संपूर्ण माहिती दिली. सदरील कार्य शाळेमुळे उपस्थित विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. तर कार्यशाळेत उपस्थित सर्व मान्यवरांचे आभारप्रदर्शन अरुणा मराठे यांनी मानले.