मोराणे, धुळे :- दि.२५डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे, धुळे अंतर्गत स्पर्धा परीक्षा व प्लेसमेंटसेल च्या मार्फत आयोजित मुलाखत कौशल्य कार्यशाळेत अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. विष्णु गुंजाळ यांनी वरील मत व्यक्त केले. ते पुढे बोलताना असे म्हणाले की, महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अनेक कौशल्य विकसित झाले पाहिजे या संदर्भातच महाविद्यालयामध्ये वर्षभरात विविध कार्यक्रम, कार्यशाळा आयोजित केले जातात. याचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा तसेच प्लेसमेंट सेल यांनी आयोजित केलेल्या या कार्यशाळेचेही त्यांनी विशेष कौतुक केले व स्पर्धेच्या जगात अधिकाधिक कौशल्याने संपन्न विद्यार्थीच नोकरीच्या संधी मिळवू शकतो अशी आग्रही मांडणी केली.
कार्यशाळेच्या प्रस्ताविके मध्ये कन्व्हेनर प्रा. डॉ. सुदाम राठोड यांनी कार्यशाळेचे उद्देश स्पष्ट केले. त्यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी हा अधिकाधिक कौशल्याने संपन्न असावा याचसाठी सदरील कार्यशाळा आयोजित केली आहे असे मत व्यक्त केले.
कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. फरीदा खान यांनी मुलाखत कौशल्याचे विविध तंत्र आणि मंत्र उपस्थित विद्यार्थ्यांना विशद करून सांगितले. मुलाखतीला जाताना आपले शैक्षणिक पात्रतेची सर्व कागदपत्रे पेन ड्राईव्ह मध्ये ठेवणे, कपडे नीटनेटके असणे, उत्तर देताना स्पष्टता असावी. अद्यावत माहिती नी उत्तर देणे हे नोकरीच्या संधी मिळवण्यासाठी महत्त्वाचे आहे असे विविध उदाहरणातून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदरील कार्यशाळे मुळे उपस्थित विद्यार्थी मोठ्या प्रमाणात समाधानी दिसून आले,आणि निश्चितच भविष्यात अशा कार्यशाळे मुळे कौशल्य वृद्धीसाठी मदतच होईल असे मत व्यक्त केले.
शेवटी कार्यशाळेचे समारोप प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभारप्रदर्शन दिपाली राया गावित यांनी मानले.