शेतकऱ्यांनी फार्मर आयडी लवकरात लवकर तयार करून घ्यावेत ,कृषी मित्र-किरण भामरे

 ज्ञानेश्वर सेंदाणे त-हाडी प्रतिनिधी
त-हाडी:-शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरीत्या पोहोचविता यावा, याकरिता कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अॅग्रीस्टॅक (डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर अॅग्रिकल्चर) योजना राज्यात १५ डिसेंबर पासून राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शिरपूर तालुक्यातील त-हाडी आभणपुर व ममाणे गावातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करून आपली फार्मर आयडी लवकरात लवकर तयार करून घेणे असे आवाहन कृषीमित्र किरण भामरे यांनी केले आहे.

शासनाच्या येत असलेल्या विविध योजनांचा लाभ सुलभ व पारदर्शक पद्धतीने तसेच वेळेत उपलब्ध करणे शेतकऱ्यांना पीक कर्ज पिक विमा किसान क्रेडिट कार्ड हवामान अंदाज किसान किसान योजनेचे

अनुदान उच्च गुणवत्तेची कृती निविष्ठा विपणन स्थानिक आणि विशिष्ट तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देत शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ जलद गतीने देण्यासाठी शेतकऱ्यांची एग्री स्टॅग वर नोंदणी करत प्रत्यक्ष शेतकऱ्याला एक फार्मर आयडी देण्यात येत आहे शेतकऱ्यांना आपला फार्मर आयडी हा स्वतः सेल्फ रजिस्ट्रेशन मोडद्वारे तयार करण्यासाठी ऑनलाइन सुविधा आपल्या जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन करून घेणे. तसेच राज्य सरकारच्या पीएम किसान योजना व नमो किसान योजनेचे पैसे घ्यायचे असतील तर शेतकऱ्यांच्या एक ओळखपत्र अनिवार्य करण्यात येणार आहे त्यासाठी आपण फार्मर आयडी लवकरात लवकर तयार करून घेणे महत्त्वाचे आहे यात ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना मोठा त्रास ही सहन करावा लागत आहे. त्यात आपला सातबारावर आधार लिंक करणे त्यात आधारला मोबाईल नंबर लिंक करणेही आवश्यक आहे. शासनाचे ३१ जानेवारीपर्यंत पन्नास टक्के राज्यातील शेतकऱ्यांचं फार्मर आयडी तयार होण्याचं गरजेचं होतं परंतु हे शक्य न झाल्याने यासाठी केंद्र शासनाने व राज्य शासनाने प्रशासनाला वेळोवेळी माहिती देत शेतकऱ्यांना फार्मर आयडी बनवण्यासाठी सोयस्कर होईल या पद्धतीने नियोजन केले जात आहे.असे यावेळी कृषी मित्र किरण भामरे यांनी सांगितले.

 टिप :- अनेक ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना फार्मर आयडी व शासनाचे अनेक योजना विषयी माहिती नसून आमच्या सारख्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेट देऊन योग्य ती वेळोवेळी माहिती देत त-हाडी गावातील कृषी मित्र किरण भामरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. 

शेतकरी- योगेश अहीरे,

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार