मोराणे :-दि. 14 जानेवारी 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे धुळे येथे, आज क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात टी. वाय. बी. एस.व एम. एस.डब्ल्यू. भाग 2 च्या या दोन वर्गाच्या फायनल क्रिकेट मॅच मध्ये सुरुवातीला बॅटिंग करण्याच्या निर्णय एम. एस. डब्ल्यू.भाग 2 या टीमने घेतला. आठ ओव्हर मध्ये 99 रन काढले होते. विजेता होण्यासाठी टी.वाय.बी. एस. डब्ल्यू च्या क्रिकेट टीमला 100 रनाच्या टारगेट जिंकण्यासाठी दिला होता. त्यात 8 ओव्हर मध्ये फक्त 38 रन टी.वाय. बी.एस. डब्ल्यू च्या टीमने काढले होते. तसेच या क्रिकेट मॅच मध्ये एम एस डब्ल्यू भाग 2 च्या टीम 61 रननी विजेता झाली. त्याबद्दल महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी झालेल्या टीमला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर टीम सोबत ग्रुप फोटो काढण्यात आला.
या क्रिकेट मॅच पाहण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी, व बी.एस.डब्ल्यू व एम. एस.डब्ल्यू चे विद्यार्थी उपस्थित आदी होते.