चौगावात माविम संस्था विषयी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

 धुळे प्रतिनिधी प्रकाश नाईक

चौगाव :- समता शिक्षण संस्था पुणे संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे, धुळे तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक ०५/०२/२०२५ रोजी चौगाव गावात महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या मार्फत स्थापित महिला बचत गट यांच्यातील सदस्यांना संस्थेविषयी माहिती देण्यात आली तसेच बचत गट म्हणजे काय, बचत गटाची रचना, बचत गटाची कार्यप्रणाली, बचत गट अंतर्गत महिलांचा होणारा आर्थिक विकास व महिला कशाप्रकारे बचत गटामार्फत स्वावलंबी होत आहे याविषयी मार्गदर्शनपर कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित मान्यवर व कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणी दिपालीली भदाणे ( नीती लोकसंचालित साधन केंद्र मॅनेजर) तसेच प्रमुख पाहुणे माधुरी पाटील मॅडम (MIS अधिकारी )उपस्थित मान्यवर आशा गुरव  (सहयोगिनी) व मंगल ताई मिस्तरी( सीआरपी चौगाव) उपस्थित होते.

दिपाली भदाणे मॅडम यांनी सर्व बचत गटातील महिलांना बचत गटाविषयी सविस्तर माहिती दिली व महिलांकडून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या महिलांना मिळणाऱ्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत मिळत आहे किंवा नाही या देखील त्यांनी प्रतिक्रिया महिलांपासून जाणून घेतल्या महिलांनी देखील आपले मत स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केला व आपल्या समस्या सांगितल्या त्यावर भदाणे मॅडम यांनी महिलांच्या समस्यांचे अतिशय चांगल्या प्रकारे निराकरण केले.

संपूर्ण कार्यक्रम क्षेत्रकार्य मार्गदर्शक आदरणीय प्रा.डॉ.दिलीप घोंगडे  यांच्या मार्गदर्शनाने पार पाडण्यात आला.

कार्यक्रमाचे नियोजक गौरव नाईक, जयश्री पाटील,देवेंद्र पवार, दिलीप हल्लोर,यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता पवार यांनी केले व आभार प्रदर्शन अर्चना सूर्यवंशी यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार