डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयात CSR प्रकल्प प्रस्ताव लिखाण या विषयावर चर्चासत्र संपन्न

मोराणे प्रतिनिधी प्रकाश नाईक

मोराणे :- दि. 05 फेब्रुवारी 2025 रोजी मोराणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय येथे, संशोधन व विकास कक्ष यांच्या वतीने CSR प्रकल्प प्रस्ताव लिखाण या विषयावर महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी दिनांक 05 फेब्रुवारी 2025 रोजी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी साधनव्यक्ती म्हणून लुपिन ह्युमन वेल्फेअर अँड रिसर्च फाउंडेशन यांचे जिल्हा व्यवस्थापक सुनील सैंदाणे व विभागीय समन्वयक निलेश पवार हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संशोधन व विकास कक्षाचे संचालक प्रा. डॉ. रघुनाथ महाजन यांनी चर्चासत्राचे प्रास्ताविक करताना या चर्चासत्राची गरज व महत्व स्पष्ट केलं. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ यांनी चर्चासत्राचे महत्त्व स्पष्ट करताना समता शिक्षण संस्था व महाविद्यालयाच्या विकासासाठी तसेच भौतिक सुविधांच्या विकासासाठी CSR प्रकल्प प्रस्ताव विविध CSR निधी देणाऱ्या कंपन्यांना सादर करणे कसे आवश्यक आहे याचे विश्लेषण केले. तसेच हे चर्चासत्र झाल्यानंतर महाविद्यालयातील प्राध्यापक निश्चितच CSR कंपन्यांना प्रकल्प प्रस्ताव सादर करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर साधन व्यक्ती निलेश पवार सर यांनी CSR ची संकल्पना, सी एस आर चा इतिहास, सीएसआर कायद्यातील मुख्य तरतुदी, त्याचप्रमाणे कोणत्या कंपन्या कोणत्या सामाजिक कामासाठी निधी देतात व तो कसा दिला जातो. या बाबत सविस्तर मांडणी केली. त्यानंतर दुसरे साधन व्यक्ती सुनील सैंदाणे यांनी सीएसआर प्रकल्प प्रस्ताव कसा सादर करावा, त्यातील विविध टप्पे, प्रत्येक टप्प्यातील बारकावे, त्यांचे लिखाण कसे करावे, कोणत्या बाबींसाठी प्राधान्याने कंपन्यांकडून निधी दिला जातो, तसेच प्रकल्पाचा कालावधी, त्यातील उपक्रम व त्यासाठी लागणारा निधी या सर्वांचा कृती आराखडा कसा तयार करावा, जास्तीत जास्त चांगला प्रस्ताव कसा लिहावा याबद्दल सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी संशोधन सल्लागार समितीच्या समन्वयक प्रा. फरीदा खान यांनी उपस्थित साधन व्यक्ती, महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक यांचे आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार