धुळे :-धुळे जिल्ह्याच्या निकुंभे, ता. जि. धुळे येथील जिल्हा परिषद शाळेत ६ जानेवारी २०२५ रोजी ग्रामीण अध्ययन शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. समता शिक्षण संस्था, पुणे संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे यांच्या वतीने आयोजित केलेल्या या शिबीराचा प्रारंभ मा. मयुरी दादासाहेब पाटील, दादासाहेब पाटील, भिका पाटील आणि दिनेश वाघ यांच्या उपस्थितीत पार पडला.
शिबीराच्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. मयुरी पाटील, सरपंच उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दादाभाई पाटील, माजी विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ता यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. भिका विठ्ठल पाटील, पंचायत समिती सदस्य यांनी ग्रामपंचायत आणि ग्रामीण विकासावर आपले अनुभव विद्यार्थ्यांसोबत शेअर केले. दिनेश हिरामण वाघ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी गावाबद्दल आणि ग्रामीण विकासाविषयी विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन केले.
शिबिराच्या आयोजनात प्रा. डॉ. रघुनाथ महाजन, प्रा. डॉ. राजेंद्र बैसाणे यांनी केले.