जळगाव :- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सन 2000 रोजी " सहायक " पदावर रुजू झालेले श्री. सुरसिंग लालसिंग वळवी यांना दि. 01 जानेवारी, 2025 रोजी " वरिष्ठ सहायक " पदावर पदोन्नती मिळाल्याबद्दल ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाॅईज फेडरेशन (AIAEF) जिल्हा- जळगाव मार्फत दि. 06 जानेवारी, 2025 रोजी दुपारी 02.00 वा. विद्यापीठ पतपेढीच्या सभागृहात राज्य कार्याध्यक्ष श्री. गजमल पवार (उपकुलसचिव) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमात दि. 13, 14 व 15 जानेवारी, 2025 रोजी पानखेडा-पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे येथे आयोजित होणा-या आदिवासी एकता परिषद व्दारा 32 वां आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनासाठी उपस्थित राहण्याबाबत आव्हान करण्यात आले. सत्कार समारंभास श्री. वसंत वळवी (जिल्हा उपाध्यक्ष), श्री. प्रकाश वसावे (जिल्हा सचिव), सदस्य श्री. किरण राऊत, श्री. स्नेहल कुवर, श्री. अर्जुन महाले, श्री. भटू लांडगे, श्री. सुरेश लांडगे, श्री. अभिमन्यू पवार, श्री. शंकर गुरले, श्री. कृष्णा लांडगे, श्री. सागर लांडगे यांची उपस्थिती होती.