क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम काळाची गरज*! *प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ

मोराणे प्रतिनिधी प्रकाश नाईक

मोराणे धुळे:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज कार्य महाविद्यालय मोराणे व शहर क्षयरोग दुरीकरण कार्यालय महानगरपालिका धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम प्रसंगी वरील मत प्राचार्य डॉ. विष्णु गुंजाळ यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना त्यांनी देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या क्षयरोग मुक्त भारत शपथेची पूर्तता करण्यासाठी समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आरोग्य दूत म्हणून मोठी जबाबदारी पार पाडू शकतो, यासाठी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना संबोधन करताना आवाहन केले. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. रिझवान शहा यांनी क्षयरोगाची लक्षणे,क्षयरोगाचे निदान, क्षयरोगाचे खात्रीशीर इलाज,

क्षयरोगाचे प्रचार व प्रसार यासंदर्भात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांचे शंकांचे निरसन करण्यात आले. त्याचबरोबर या कार्यक्रमात प्रीती कुलकर्णी यांनी क्षयरोग मुक्त भारत याची शपथ उपस्थित सर्वांना दिली आणि याच कार्यक्रमाला पर्यवेक्षक शशिकांत कुंवर यांनी प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेतला. ज्यामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना क्षयरोगाच्या संदर्भात विविध प्रश्न विचारून योग्य उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य बक्षीस वाटप करण्यात आले. ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रोत्साहन आणि अधिकच्या जबाबदारीची जाणीव होईल हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून व्यापक जनजागृतीसाठी आरोग्य दूत निर्माण करणे हे पाहिले गेले. प्रश्नमंजुषा कार्यक्रमात गिरीश पाटील, जीवन भारुडे, अरुणा मराठे, डॉ. सुदाम राठोड, प्रकाश नाईक, छाया पावरा, जयश्री वाघ, नेहा धिवरे, जयश्री पाटील, गणेश धूम, इत्यादींनी बक्षीस मिळवले.सदरील कार्यक्रमाचे सूत्रबद्ध पद्धतीने सूत्रसंचलन व उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा. डॉ. सुदाम राठोड यांनी मानले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार