मोलगी:- अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील ग्रामविकास मंडळ संस्था संचलित प्रा. बी एस सैदाणे कला व विज्ञान कनिष्ठ विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून बार्टीचे धडगांव व अक्कलकुवा तालुका समतादूत ब्रिजलाल पाडवी, महाविद्यालयाचे प्राचार्य विनोद कुंवर, प्रमुख मान्यवर प्रा.दिनेश प्रजापती तर अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्रा.धनसिंग वसावे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रा.मनोज चौरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य विनोद कुंवर यांनी सावित्रीबाई फुले यांचे अस्पृश्य निवारण,बालविवाह,सती जाणे, केशवपन या अनेक याविषयाच्याआधारे वेगवेगळे उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. यानंतर प्रमुख अतिथी ब्रिजलाल पाडवी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्याची माहिती देत स्री पुरुष समतेविषयी मार्गदर्शन केले. प्रा.मनोज चौरे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवन परिचय करुन देत बालीका दिन महत्त्व पटवुन दिले. त्यानंतर प्रा.धनसिंग वसावे यांनी सावित्री बाई यांचे सामाजिक, शैक्षणिक कार्यासह, काव्यसंग्रह व विविध साहित्यिक विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी सुभाष पाडवी,विजय पाडवी,समाधान महाजन व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मनोज चौरे तर आभार प्रा.दिनेश प्रजापती यांनी मानले.