मोराणे :- धुळे दिनांक ०३ जानेवारी २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना सावित्रीबाई फुले या खऱ्या आद्य शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात, तसेच स्त्री शिक्षण, बालविवाह, समाजातील अंधश्रद्धा घालवणे हीच सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने संकल्प करूया अशी भावनिक आवाहन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा आढावा या प्रसंगी घेतला पाहिजे. वाचन केले पाहिजे, आणि त्यांचे कार्य निरंतर पुढे चालू ठेवले पाहिजे, अशी आशा व्यक्त केली. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना जयश्री वाघ, अरुणा मराठे, यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याला उजाळा दिला तसेच प्रा. डॉ. फरीदा खान यांनी सावित्रीबाई फुले यांचा संघर्षमय जीवन उपस्थित विद्यार्थ्यांना विशद केले. जयंती कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रा. डॉ. रघुनाथ महाजन, प्रा. डॉ. गोपाळ निंबाळकर, प्रा.डॉ. सुदाम राठोड, डॉ. प्रमोद भुंबे, प्रा.डॉ. संजय पगारे, प्रा. डॉ. राजेंद्र बैसाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुणा मराठे यांनी केले तर सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. राहुल आहेर यांनी मानले. तसेच कार्यक्रमाला बी.एम.डब्ल्यू. एम. एस.डब्ल्यू. चे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.