अक्कलकुवा जामिया शिक्षणशास्त्र महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरा

 

अक्कलकुवा :- आज दि. ०३ जानेवारी २०२५ रोजी अक्कलकुवा जामिया शिक्षणशास्त्र महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरा करण्यात आली.

 कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य साजीद पिंजारी असून प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.सरिता पाडवी हे उपस्थित होते. प्रा. सरिता पाडवी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी घेतलेले परिश्रम याविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज आपण शिक्षण घेत आहोत. शिक्षणामुळे आजची स्त्री ही वेगवेगळ्या क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करत आहे. बी. एड. च्या विद्यार्थी शिक्षकांनी सुध्दा आपल्या भाषणात सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला उजाळा दिला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य साजीद पिंजारी यांनी सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला. 

        यावेळी कार्यक्रमात प्रा. मोहसीन पठाण, प्रा. तौसिफ अन्सारी, प्रा.अमजद कमल, प्रा. मो. फैज प्रा. इमरान व शिक्षकेतर कर्मचारी व बी. एड.चे विद्यार्थी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार