जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतले निसर्गाचे धडे - जि. प. शाळा हरणखुरी भुजगावाचा अभिनव उपक्रम

धडगांव :- हरणखुरी गावाचा येथील निसर्गसंपन्न परिसर, सकाळची बोचरी थंडी, सकाळचे कोवळे ऊन अंगावर घेत, पायी प्रवास, ग्रामपंचायतीचे नवनवीन उपक्रम आणि गावातील दिसणाऱ्या मोरांचे दर्शन असा काहीसा हरणखुरी आणि भुजगांव गावातील  65 विद्यार्थ्यांनी अनुभव अनुभवला. निमित्त होते जि. प.शाळा हरणखुरी आणि भुजगाव  येथील विद्यार्थ्यांचे एक दिवशीय निसर्ग शिक्षण सहल.गृप ग्रामपंचायत भुजगांव अंतर्गत येणारे हरणखुरी गावांत ग्रामस्थांच्या पुढाकारातून आणि सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीचे प्रयत्नातून 52 हेक्टरवर पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम मागील काही वर्षांपासून सुरु आहे. या उपक्रमासाठी वन समितीला संत तुकाराम वनग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

           हरणखुरी आणि भुजगांव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी गांव डोंगरगाव  परिसरात निसर्गाचे धडे घेतले.मानवाला अन्न वस्त्र निवारा यासोबतच निसर्गाचे मानवी जीवन किती महत्त्व आहे हे पटऊन देण्यासाठी या निसर्ग भ्रमणचे आयोजन मुख्याध्यापक रघुनाथ भंडारी आणि रामोळे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले या निसर्ग भ्रमनात पक्ष्यांचीओळख,झाडांची माहिती वन्यप्राणी त्यांची ओळख पाऊलखणा आदी विषय विद्यार्थ्यांनी समजून घेतले. गावातील शेतकरी जोरदार पावरा यांच्या काजू आणि आंबा फळ वाडी, शेततळे माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी वन भोजनाचा देखील आस्वाद घेतला.विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक रघुनाथ भंडारी, अनिल रामोळे सहशिक्षक ब्रिजलाल चव्हाण, दिलवर पावरा युवा कार्य प्रशिक्षण शिक्षण चिलवर पावरा, , मेलदी पाडवी यांनी मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले.जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना नवनवीन धडे देण्यासाठी ते वेगवेगळे उपक्रम करीत असतात त्यातीलच हा उपक्रम यशस्वी झाला असल्याचे विद्यार्थ्यांच्या मनोगतातून दिसून आले.


 

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार