मोराणे समाजकार्य महाविद्यालयात, लोकसहभागातून गावाचा अभ्यास - सूक्ष्म नियोजन या विषयावर कौशल्य कार्यशाळेचे आयोजन

मोराणे प्रतिनिधी प्रकाश नाईक

मोराणे :-समता शिक्षण संस्था पुणे संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे येथे,दिनांक ०२ जानेवारी २०२५ रोजी  बी.एस.डब्लू. भाग १ या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी लोकसहभागातून गावाचा अभ्यास आणि सूक्ष्म नियोजन या विषयावर कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. भरत खंडागळे  उपस्थित होते तर प्रा. शामसिंग वळवी हे कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तसेच प्रा. डॉ. सुवर्णा बर्डे आणि प्रा. मेघावी मेश्राम हे  सुद्धा कार्यशाळेला उपस्थित होते.  डॉ. भरत खंडागळे यांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये लोकसहभागातून गावाचा अभ्यास तंत्र म्हणजे ग्रामीण विकास आणि गावाच्या विविध पैलूंना समजून घेण्यासाठी आणि त्यावर कार्यवाही करण्यासाठी लोकांच्या सहभागाचा उपयोग करणे. या तंत्राचा उपयोग शाश्वत विकास, सामाजिक बदल, आणि गावच्या समस्या सोडवण्यासाठी होतो. PRA चा उद्देश गावकऱ्यांच्या स्वतःच्या गरजा, समस्या, संसाधने आणि पर्यावरण यांचा समर्पक आणि सखोल अभ्यास करणे आहे, आणि त्यात गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग असतो.

या तंत्राचा उपयोग ग्रामीण भागात संसाधनांची कार्यक्षम व योग्य वापरासाठी, तसेच लोकांना त्यांच्या समस्यांचा सुयोग्य उपाय मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो.त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील समस्यांवर त्वरित आणि प्रभावी उपाय शोधणे, गावकऱ्यांना त्यांच्या विकासाच्या प्रक्रियेत मुख्य भूमिका दिली जाते. त्यांच्याशी संवाद साधून, सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्टीटिकोनातून गावातील परिस्थितीचा सखोल अभ्यास करणे आणि त्या आधारावर समर्पक योजनांची आखणी करणे, हे मुख्य उद्देश्य आहे.                                             त्याचप्रमाणे सूक्ष्म नियोजनावर सरांनी मार्गदर्शन करीत असताना सांगितले की, सूक्ष्म नियोजन म्हणजेच स्थानिक स्तरावर किंवा लहान युनिटवर आधारित योजना तयार करण्याची प्रक्रिया आहे . यात गाव, शहरी बस्त्या किंवा विशिष्ट छोटे समुदाय लक्षात घेऊन, त्यांच्याशी संबंधित सर्व आवश्यक बाबींचे सखोल आणि सूक्ष्म मूल्यांकन केले जाते. यामध्ये स्थानिक गरजांनुसारतंतोतंत आणि व्यावसायिकदृष्ट्या तशा योजना तयार केल्या जातात ज्यामुळे त्याच समुदायाला लाभ होईल. 

           अशाप्रकारे लोकसभागातून गावाचा विकास आणि सूक्ष्म नियोजन या दोन्ही गावाचा अभ्यास करणाऱ्या तंत्रावर सरांनी सखोल असे मार्गदर्शन केले कार्यशाळेचे आयोजन आणि नियोजन बी.एस.डब्ल्यू भाग - १ वर्गाच्या वर्गशिक्षिका प्रा. मेघावी मेश्राम यांनी केले तर कार्यशाळेचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन देवायानी पाटील हिने केले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार