अक्कलकुवा येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय सुरु करा – अक्कलकुवा वकील संघाची मागणी

अक्कलकुवा :-  अक्कलकुवा वकील संघाच्या  वतीने अक्कलकुवा येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय सुरु करण्याबाबतचे निवेदन   उच्च न्यायलायचे औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती तथा नंदुरबार जिल्हा पालक न्यायमुर्ती किशोर संत यांना देण्यात आल.निवेदनात म्हटले कि,नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल अतिदुर्गम भौगोलिक क्षेत्र असलेला जिल्हा आहे. नंदुरबार जिल्ह्यात एकुण 06 तालुके असून जिल्ह्यात 02 ठिकाणी सत्र व दिवाणी न्यायालय, वरीष्ठ स्तर न्यायालये सुरु आहेत. 1) नंदुरबार येथे ज्यात नंदुरबार व नवापूर या तालुक्यांचा समावेश आहे, 2) शहादा येथे ज्यात शहादा, अक्कलकुवा, धडगांव व तळोदा तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे. नंदुरबार जिल्हा हा दुर्गम व अती मागास जिल्हा असून शहादा येथे सुरु असलेल्या न्यायालयात 4 तालुक्यांचा समावेश असल्यामुळे दिवाणी व फौजदारी प्रकरणे मोठ्या प्रमाणार प्रलंबित आहे. त्यामुळे चारही तालुक्यातील नागरीकांना वेळेवर न्याय गिळत नाही तसेच सदर जिल्हा अतिदुर्गमभागाचा असल्यामुळे व भौगोलिक दृष्ट्या क्षेत्राधिकाराची विभागणी झाली नसल्यामुळे अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा नदीच्या काठावर वसलेल्या गावांपासून शहादा येथे येण्यासाठी किमान 150 ते 200 कि.मी. चे अंतर पायपीट करुन न्यायालयीन कामकाजाकरीता यावे लागत असते. अक्कलकुवा तालुका हा अती दुर्गम भागात वसलेला तालुका असल्यामुळे एस.टी. बसेस ची व प्रवासी वाहतुकीची कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे बहुतेक गावामध्ये पायी चालून प्रवास करावा लागत असतो. त्यामुळे सत्र व दिवाणी न्यायालय, वरीष्ठ स्तर शहादा येथे न्यायालयीन कामकाजाकरीता वेळेवर हजर राहता येत नाही तसेच न्यायालयाचे कामकाज संपल्यानंतर गावी जाण्यासाठी वाहतुकीची सोय होत नसल्यामुळे पक्षकारांना वेळोवेळी असुरक्षित व अनिश्चीत ठिकाणी मुक्काम करण्याची वेळ येत असते. अतिदृगम भागातील पक्षकारांना शहादा येथे न्यायालयीन कामकाजाकरीता सुमारे 300 ते 400 कि.मी. चे अंतर प्रवास करुन ये-जा करावे लागत असते.

         शहादा येथे सुरु असलेल्या सत्र व दिवाणी न्यायालय, वरीष्ठ स्तर चे क्षेत्र अधिकारातील तालुक्यांचा भोगौलिक दृष्ट्या विचार केला असता शहादा व धडगांव तालुक्याचे क्षेत्राधिकार शहादा येथे असणे योग्य आहे तर अक्कलकुवा व तळोदा तालुक्याचे क्षेत्राधिकार वेगळे करुन अक्कलकुवा येथे नवीन न्यायालय स्थापन करणे आवश्यक व जरुरीचे आहे. अक्कलकुवा येथे नवीन न्यायालय स्थापन करण्यासाठी प्रशस्त इमारत उपलब्ध असून न्यायालयाची खुली जागा देखील मुबलक स्वरुपात उपलब्ध आहे तसेच अक्कलकुवा येथे नवीन न्यायालयाची स्थापना झाल्यास तळोदा तालुक्यातील पक्षकारांना देखील सोयीचे होईल. तळोदा हुन अक्कलकुवा येथे येणे साठी जास्तीत जास्त 30 ते 40 अंतर कापुन अक्कलकुवा येथे सहजपणे येणे शक्य आहे, मात्र शहादा किंवा नंदुरबार येथे जावे लागल्यास अक्कलकुवा तालुक्यातील अतिदृर्गम भागातील पक्षकारांना 100 ते 150 कि.मी. चा अधिकचा प्रवास करावा लागु शकतो व न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांची संख्या पाहता व पक्षकारांची होणारी गैरसोय लक्षात घेता अक्कलकुवा येथे तालुक्याचे ठिकाणी अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायालय वरीष्ठ स्तर ची स्थापना होणे अत्यंत आवश्यक आहे. सबब पक्षकारांचे हितासाठी सहानुभूतीपुर्वक विचार करुन अक्कलकुवा येथे अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायालयाची स्थापना होणे आपल्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही प्रस्तावीत करुन गरजु व दुर्लक्षीत पक्षकारांचा हितासाठी प्राधान्याने तात्काळ कार्यवाही करण्यात यावी,अशी मागणीचे निवेदन अक्कलकुवा वकील संघाच्या  वतीने  उच्च न्यायलायचे औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती तथा नंदुरबार जिल्हा पालक न्यायमुर्ती किशोर संत देण्यात आले. निवेदन देतांना अक्कलकुवा वकील संघाचे अध्यक्ष ॲड .संग्रामसिंग पाडवी सचिव ॲड. रुपसिंग वसावे ,खजिनदार ॲड. गजमल वसावे , सहसचिव ॲड .दिपक वळवी, ॲड.फुलसिंग वळवी,ॲड.जितेंद्र वसावे,ॲड.रुपसिंग तडवी ,ॲड.राज नाईक, ॲड.सुरेश वसावे,ॲड.संदिप वसावे,ॲड.शंकर तडवी,ॲड. विजेंद्र नाईक,आदी  वकील संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 चौकट -अक्कलकुवा तालुका हा अतिदुर्गम असून या तालुक्याचे सीमा गुजरात राज्यातील सरदार सरोवर डॅमला लागून आहे. हा तालुका दोऱ्या खोऱ्यात विखुरलेला तालुका आहे. प्रत्येक गावपाड्यात जाण्यासाठी अद्याप पावतो एसटी बसेसची व्यवस्था नाही. अशावेळी दुर्गम भागातील पक्षकरांना 60 ते 70 किलोमीटर  पायपीट करुन बाजारपेठ गाठावे लागते. अशा परिस्थितीत न्यायालयीन कामकाजाकरिता 150 ते 200 किलोमीटर प्रवास करुन जाणे जिकरीचे ठरत असल्याने अक्कलकुवा येथे अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन झाल्यास सामान्य जनतेची होणारी गैरसोय दुर होईल.

 ॲड .संग्रामसिंग पाडवी

       अध्यक्ष

अक्कलकुवा वकील संघ 

चौकट -शहर व अक्कलकुवा तालुक्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना गुन्ह्यांची संख्या सुध्दा वाढत आहे.अशा परिस्थितीत भौगोलिक परिस्थिती पाहता अक्कलकुवा   येथे अतिरिक्त जिल्हा सत्र व दिवाणी वरीष्ठ स्तर न्यायालय सुरू करण्याची गरज व्यक्त होत आहे. वरिष्ठ न्यायालय सुविधा नसल्याने सर्वाना न्यायासाठी शहादा येथे जावे लागत असल्याने वकील पक्षकार पोलीस या सर्वानाच वेळेचा अपव्यय आर्थिक व मानसिक झळ सोसावी लागत.

ॲड. रुपसिंग वसावे

   सचिव 

अक्कलकुवा वकील संघ

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार