मोराणे :-समता शिक्षण संस्था पुणे संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे धुळे येथे दिनांक 06 जानेवारी 2025 ते 11 जानेवारी 2025 एक आठवड्याचा कौशल्य विकास कार्यशाळेचे पार पडली. कौशल्य कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्याचा विकास व्हावा, संघकार्य (Team work) करण्याचे कौशल्ये विकसित व्हावे. संशोघन पेपर लिहण्याचे कौशल्ये विकसित व्हावे, मुलाखत कौशल्ये विकसित व्हावे. पथनाट्य सादरीकरणाचे कौशल्य या शाळेमध्ये शिकविण्यात आले. त्याचबरोबर शिकवलेल्या प्रत्येक कौशाल्यांचे सादरीकरण घेण्यात आले.
एक सप्ताह कौशल्ये विकास कार्यशाळाच्या उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. विष्णू गुंजाळ, प्रमुख पाहुणे म्हणून ग्रंथपाल गजेंद्र जगदेव आणि साधन व्यक्ती म्हणून रविंद्र पाटील आणि रविंद्र माळी आचार्य अभ्यासक तर महाविद्यालयातील प्रा. डॉ.प्रमोद भुंबे आणि प्रा. डॉ.राठोड तसेच कार्यशाळेच्या समन्वयक प्रा .डॉ.सुवर्णा बर्डे उपस्थित होते. ही कार्यशाळा TYBSW च्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली होती. एका आठवड्याच्या कार्यशाळा मुळे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये विकसित झाले.