पपई उत्पादक शेतकऱ्यांनी संघटित व्हा:- कृषीभूषण श्री.सुदाम करंके

त-हाडी:- यावर्षी शिरपूर व शहादा तालुक्यातील पपई फळाची काढणी सुरुवात नोव्हेंबर पासून झालेले आहे. पंधरा ते वीस रुपये किलो प्रमाणे भाव चालू होता त्या भावाप्रमाणे व्यवस्थित  शेतकरी व व्यापारी यांच्या व्यवहार होत होता. शहादाहून दररोज दहा ते बारा गाडी भरली जात असताना अचानक चार ते पाच व्यापारी बंधूंनी एका कागदावर आपला मनाप्रमाणे भाव लिहून ग्रुप वर टाकून मनोपॉलिसी करून हिटलरशाही करून भाव पाडण्याचे षडयंत्र नेहमीप्रमाणे चालवले आहे.खान्देश म्हटलं म्हणजे आणि त्यातल्या त्यात शिरपुर व शहादा हे पपई पिकाचे आगर. यावर्षी अति पावसामुळे पपई पिकाचे फार मोठे नुकसान झाले हे फळ धारणेच्या वेळेस नेमके फुलगळ झाली आणि परिणामी झाडावर फळांची संख्या मर्यादित राहिली. काही बागांमध्ये पाणी साठवून बागा गुदमरल्या काही बागांना डाऊनी या रोगांचा प्रादुर्भाव होऊन बागा उद्ध्वस्त झाल्या तर काही भागांना व्हायरसचा फटका बसला अशा आपत्ती जनक परिस्थितीमध्ये शेतकरी कसा  बसा तरु पहात असताना त्यातच  दुष्काळात तेरावा महिना असा म्हणता येईल असा प्रकार पपई व्यापारी करताना दिसतात.पपई पिकाची उत्पादन कमी असताना सुद्धा व्यापारी मीटिंग घेऊन दर कमी करण्याच्या विचारात आहेत. पपईच्या मालाला पर प्रांतामध्ये म्हणजे बिहार ,राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये भरपूर मागणी असताना व स्थानिक व्यापाऱ्यांना फोनवर फोन येत असताना आणि पूर्ण पेमेंट रोख टाकतो पण आम्हाला एक तरी गाडी द्या असं ते विनंती  करीत असताना तरी व्यापारी भाव वाढीचा विचार न करता पुन्हा भाव कमी केला. सुरुवातीला पपईचा भाव हा १६ रुपये किलो प्रमाणे होता तोच काही दिवसातच त्यांनी तो भाव अगदी बारा ते तेरा रुपयांच्या घरात आणला .आता अवघा दहा ते बारा रुपयांवर आणण्याच्या विचारात व्यापारी आहेत .खरं म्हणजे यावर्षी कमी  उत्पादकता व उत्पादन खर्च जास्त असल्याने पंधरा रुपये सुद्धा भाव परवडणार नाही .आपण जरी असं बिनबोभाट व्यापारांची मनमानी सहन करीत राहिलो तर एक दिवस असा येईल की आपल्याला पपई पीक सोडावे लागेल. शेतकऱ्यांनी जागृत होऊन, मोठ्या संख्येने एकत्र येऊन या विषयावर चिंतन केलं पाहिजे व पपई लागवड शेतकऱ्यांनी मार्केट याचा विचार करता पपई ला पुढचे दिवस ही चांगले असतील ते शेतकऱ्यांच्या हाती आहे. पाच ते सहा व्यापाऱ्यांच्या कागदावरच्या सह्यांना बळी पडू नये अशा व्यापारांना शेतकऱ्यांनी आपली पपई देऊ नये असे आवाहन यावेळी महाराष्ट्र कृषी भूषण सुदाम करंके यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार