जुने धडगाव केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत जि.प. शाळा गौऱ्याचे वर्चस्व

धडगाव :- दि. ९ व १० जानेवारी २०२५ रोजी मनखेडी खु. येथे जुने धडगाव केंद्राची केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा पार पाडली.. या स्पर्धेत जि. प. शाळा गौऱ्याने चमकदार कामगिरी करत जुने धडगाव केंद्रात वर्चस्व ठेवला.

  गौऱ्या शाळेने खालीलप्रमाणे विजेते पद मिळवले.

१)कब्बड्डी लहान गट मुले- विजेता

२)कब्बड्डी लहान गट मुली - विजेता

३)खो-खो लहान गट मुले - विजेता

४)खो-खो लहान गट मुली - विजेता

५)खो-खो मोठा गट मुले - विजेता

६)रस्सीखेच लहान गट मुले- विजेता

७)रस्सीखेच लहान गट मुली- विजेता

८)कबड्डी मोठा गट मुली - उपविजेता

९)१०० मी. धावणे मोठा गट मुली- सरिता पोपटा पराडके प्रथम क्रमांक

१०)लांब उडी मोठा गट मुली-  अनुप्रिया मनशा पराडके प्रथम क्रमांक

११)१००मी. धावणे लहान गट मुले- आयुष मोहन पराडके तृतीय क्रमांक

१२)१०० मी. धावणे मोठा गट मुले- विनोद वन्या पराडके तृतीय क्रमांक

१३)लांब उडी मोठा गट मुले- शरद राकेश पाडवी तृतीय क्रमांक

१४)गोणपाट मोठा गट मुली- सरिता पोपटा पराडके तृतीय क्रमांक

     वरीलप्रमाणे जि. प. शाळा गौऱ्याच्या विद्यार्थ्याने केंद्रास्तरीय स्पर्धेत यश मिळवल्याने सर्वत्र कौतुक होत आहेत.आता पुढील आठवड्यात तालुकास्तरीय स्पर्धा होणार आहेत..विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री. गवळी सर, श्री. विजय पराडके सर,श्रीम. सुरेखा पावरा मॅडम, श्रीम. लता वळवी मॅडम, युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी उत्तम पराडके सर, शा. व्य. समिती अध्यक्षा श्रीम. मालती दिलवर पराडके, उपसरपंच मिनेश पराडके,चंद्रकांत पराडके, आपसिंग पराडके मनशा पराडके, कुवरसिंग पराडके यांचे मार्गदर्शन, सहकार्य मिळाले..विद्यार्थ्यांना गौऱ्या ते मनखेडी दोन्ही दिवशी सुरक्षित ने आन करणारे अमरसिंग पराडके यांचे शाळेच्या यशात सिंहाचा वाटा आहेत. गावातील पालक, युवकांचे सहकार्य नेहमीप्रमाणे मिळाले. सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि आभार.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार