मोराणे:- दि. १३ डिसेंबर २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज कार्य महाविद्यालय मोराणे च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित जागतिक एड्स दिनानिमित्त कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती निता इंगळे यांनी वरील मत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सदरील कार्यक्रमात श्रीमती इंगळे यांनी एचआयव्ही चा पूर्ण इतिहास उपस्थित विद्यार्थ्यांना विशद केला व समाजकार्य क्षेत्रातील परिवर्तनवादी शिलेदार सदरील समस्येची गांभीर्य लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती करतील अशी आशा व्यक्त केली. कार्यक्रमाच्याप्रसंगी वैशाली माळी यांनी समाजातील एचआयव्ही सहज जगणाऱ्या अनेक कुटुंबांची उदाहरणे देऊन उपस्थित विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले आणि भविष्यात समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात समाजात जनजागृती होईल आणि एचआयव्ही ग्रस्त अशा पीडित व्यक्तींना मानवी अधिकारा सह सन्मानाने जीवन जगता येईल असा आशावाद व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रसंगी प्राचार्य डॉ. विष्णु गुंजाळ यांनी सहभागी स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या तसेच याप्रसंगी महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. फरीदा खान यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी जागतिक एड्स दिनानिमित्त उपस्थित राष्ट्रीय स्वयंसेवकांनी HIV संदर्भात शपथ घेण्यात आली.सदरील कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ .राहुल आहेर यांनी केले तर उपस्थित सर्व पाहुण्यांचे आभार प्राध्यापक डॉ. सुदाम राठोड यांनी मानले.
एचआयव्ही तपासणी निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली ! नीता इंगळे
मोराणे प्रतिनिधी प्रकाश नाईक
Post a Comment