मोराणे,धुळे :- दि. ०६/डिसेंबर २०२४
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत असणाऱ्या समता शिक्षण संस्था पुणे संचालित डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे धुळे येथिल शैक्षणिक वर्षे २०२३-२०२४ मधील MSW IInd या वर्गातील पवार भाग्यश्री अशोक या विद्यार्थिनीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रथम क्रमांक प्राप्त केला असून विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याचबरोबर याच वर्गातील मोरे ऐश्वर्या गंजीधर या विद्यार्थिनीने सुध्दा विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. महाविद्यालयातून विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत MSW-IInd या वर्गातील प्रथम व तृतीय क्रमांक प्राप्त करणारे दोन विद्यार्थी आहेत. सोबतच BSW IIIrd या वर्गातील बहिरम सुनिता वसंतराव या विद्यार्थिनीने सुध्दा विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.त्यामुळे U.G.आणि P.G.मध्ये विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केल्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचे समता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा मा.प्रा.उषा वाघ सचिव मा.डॉ.जालिंदर अडसुळे सन्माननीय सदस्य मा.विवेक दादा वाघ, मा. ॲड.प्रतिभा गवळी,ॲड.संपत कांबळे मा.सुनिल कामत त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.विष्णू गुंजाळ विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ. राजेंद्र बैसाणे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी व मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.
Post a Comment