धुळे:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज कार्य महाविद्यालय मोराणे, धुळे येथील प्रा. डॉ. सुवर्णा बर्डे मालपाणी या गेल्या 13 वर्षापासून सहाय्यक प्राध्यापिका म्हणून काम करत आहे. त्यांचे जवळपास 38 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन पेपर प्रकाशित झालेले आहे. त्याचबरोबर अभ्यासक्रमाशी संबंधित दोन पुस्तके प्रकाशित झालेले आहे. महाविद्यालयामध्ये अनेक विभागाचे समन्वयक म्हणून त्यांनी उत्कृष्टपणे काम केलेले आहे यामध्ये अँटी रॅगिंग समिती समन्वयक, ग्रामीण शिबीर समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजनेचे महिला कार्यक्रमाधिकारी, मुलींचे वसतिगृह प्रमुख इत्यादी. गेल्या तेरा वर्षापासून समुदायांमध्ये, विविध जिल्हा परिषद शाळेमध्ये, कल्याणकारी संस्थेमध्ये त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. ज्वलंत प्रश्नावर आधारित विविध गावांमध्ये जाऊन जनजागृती चे कार्यक्रम घेतलेगेले आहे. त्याचप्रमाणे मागील दोन वर्षापासून पुनरुत्थान विद्यापीठ गुजरात येथे सदस्य म्हणून कार्यरत आहे. या सर्व कामाची दखल घेऊन पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ मथुरा येथील समितीने सर्व कागदपत्रांची छाननी करून डॉ. सुवर्णा बर्डे यांना डिलीट पदवी प्रदान केलेली आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील समाजकार्य विभागातून प्रथम डिलीट मिळण्याचा सन्मान प्रा. डॉ. बर्डे यांना प्राप्त झालेला आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.