मोराणे:- दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज कार्य महाविद्यालय मोराणे येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, घटना तज्ञ, अर्थतज्ञ, जलतज्ञ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाले. याप्रसंगी समता शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. माधवराव वाघ यांच्या पत्नी व समता शिक्षण संस्थेचे संचालक मा. विवेक वाघ यांच्या मातोश्री शांताबाई माधवराव वाघ यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. या प्रसंगी प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या अभिवादन कार्यक्रम प्रसंगी बीएसडब्ल्यू द्वितीय वर्षाचे विद्यार्थी विश्वजीत वाघ आणि अनिल बागुल यांनी आपले मनोगत व्यक्त व्यक्त करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन कार्य सर्व विद्यार्थ्यांच्या समोर विशद केले. सदरील कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. फरिदा खान यांनी मानले.
मोराणे समाजकार्य महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न
मोराणे प्रतिनिधी - प्रकाश नाईक
Post a Comment