धुळे :-दि. २४ डिसेंबर २०२४ रोजी प्रकल्प कार्यालय धुळे येथे,आदिवासी वस्तीगृहातील मुलांच्या धडक मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थ्यांची मुख्य मागणी
डीबीटीत वाढ झाली पाहिजे. तसेच डीबीटी वेळेवर पडली पाहिजे. डीबीटी वेळेवर न पडल्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. त्यामुळे
आम्ही १६ तारखेला निवेदन दिले होते,आम्ही प्रकल्प अधिकारीला निवेदन दिले होते. तसेच त्यांनी सांगितले की, २२ तारखेपर्यंत डीबीटी पडून जाईल परंतु नाही पडली म्हणून आम्ही २३ तारखेला मोर्चा काढणार होतो, परंतु एक दिवस आणखी दिलातसेच नाही. डीबीटी पडली म्हणून आम्ही 24 तारखेला या या ठिकाणी हजर झालो, परंतु प्रकल्प अधिकारी तरीही बोलले संध्याकाळी डीबीटी पडून जाईल परंतु विद्यार्थ्यांचे मत असे होते की,आयुक्तालय सरांशी समोरासमोर संपर्क साधायचा आहे म्हणून त्यांना इथे बोलवावे तर प्रकल्प अधिकाऱ्यांनी आम्हाला असे सांगितले की,आम्ही त्यांना सांगितले परंतु ते आले नाही म्हणून आम्ही ६:३० ते ७:०० वाजेपर्यंत वाट बघितली परंतु अधिकारी काय आले नाही त्यामुळे आम्हाला रस्त्यावरती उतरून सर्व आदिवासी शासकीय वस्तीगृहातील मुले व मुली त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. ७:०० वाजेपर्यंत वाट बघितली परंतु काय आले नाही, त्यामुळे आम्हाला रस्त्यावरती उतरण्याची ,वेळ आली असे मुलांनी सांगितले. तसेच ते खूप काही आम्हाला सांगत आहे की, नाशिक वरून यायला एवढा वेळ लागत नाही, परंतु त्यांनी खूप खोटी माहिती विद्यार्थ्यांना सांगत होते. तोपर्यंत आमची मागणी पूर्ण करत नाहीत तोपर्यंत आम्ही मोर्चा मागे घेणार नाही. प्रकल्प कार्यालय येथे, आदिवासी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या घोषणाबाजी करत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.