त-हाडी:-दि.१ डिसेंबर ते ७ डिसेंबर पर्यंत शिरपूर शहरात जग प्रख्यात कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मधुर वाणीतून शिव महापुराण कथे चे आयोजन करण्यात आले असून खान्देश, उत्तर महाराष्ट्र, आणि महाराष्ट्र,मध्यप्रदेश,गुजरात राज्यातील बॉर्डर जवळ असलेल्या जिल्ह्यातील,तालुक्यातील,गावातील लाँखोंच्या संख्येने भाविक भक्त शिव महापुराण कथे च्या श्रवणासाठी येत असून जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून धुळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्या अप्रतिम आर्थिक स्वरूपाच्या सहकार्याने येणाऱ्या सर्वच भाविक भक्तांसाठी अखंड सात दिवस पर्यंत मोफत जल सेवेचे शुभारंभ देवेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते पूजन करून लोकी गावातील माझी सरपंच भिमसिंग राजपुत यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून येणाऱ्या भाविकांना जल वितरण करण्यात आले.
त्या प्रसंगी सी.के.महाले सर,दिनेश पाटील,मंगल फूल पगारे,संजय येशी,पप्पू राजपूत, समवेत जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष विकास सेन उपाध्यक्ष श्रीरामचंद्र येशी उपस्थित होते.
Post a Comment