खांडबारा:- आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह खांडबारा येथील वसतीगृहात भारतीय संविधान दिवस निमित्त दि.३० नोव्हेंबर रोजी संविधानावर आधारित स्पर्धा परीक्षा घेण्यात आली व बक्षीस वितरण आज दि.०१ डिसेंबर रोजी करण्यात आले.पहिल्या तीन विजेत्यांना बक्षिसे, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सध्याचे युग हे स्पर्धेचे असल्याने वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची माहिती व आवड निर्माण व्हावी या उद्देशाने मा.प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वसतीगृहात स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले.स्पर्धेत प्रथम जयेश झुझांऱ्या पावरा दुसरा क्रमांक विभागून लक्ष्मीकांत सुनील नाईक, व सुरज रमेश कोकणी यास मिळाला तर तृतीय क्रमांक ३ जणांना विभागुण देण्यात आला रोहित मगन गावित ,विरेंद्र कुवरसिंग पावरा,देवेंद्र दिलवर कोकणी. विजेत्यांना प्रथम बक्षीस पाचशे रुपये रोख, द्वितीय तीनशे तर तृतीय बक्षीस दोनशे व प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देण्यात आले.स्पर्धेचे नियोजन व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वसतीगृहाचे गृहपाल अमोलकुमार पोपलवार यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धिरजकुमार वसावे (प्रशिक्षणार्थी) यांनी केले.कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्त्या सविता जैसवाल उपस्थित होत्या.कार्यक्रमासाठी सहकार्य वसतीगृहातील कर्मचारी जय हंसकर,हिरालाल वसावे, पंकज वसावे यांनी केले.
Post a Comment