धडगाव:- ग्रामपंचायत मांडवी खुर्द येथील सामुहिक वन हक्क समिती( CFR) क्षेत्र मध्ये समाजिक वनीकरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व समिती अध्यक्ष व सचिव. गावाचे सरपंच . पोलीस पाटील. ग्रामरोजगार सेवक.ग्रामस्थ याच्या उपस्थित( CFR) जागा पाहणी केली व कोण कोणत्या प्रकारचे कामे घेता येईल यदृष्टीने गावकऱ्यांचे चर्चा केली.गावातील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मिळून CFR क्षेत्र मध्ये सी.सी.टी. व बांबु लागवड व उत्पादन देतील असे झाडांचे लागवड करणे आवश्यक आहे.छोटे मोठे बाधरे, दगडी बांध, अशा विविध प्रकारची कामे गावातील ग्रामस्थांनी केली पाहिजे अस म्हणत वरिष्ठ अधिकारी यांनी देखिल मांडवी खुर्द येथे सामुहिक वनहक्क समितीस कामे करण्यास ग्रीन सिग्नल दिला.ग्रापंचायत मांडवी खुर्द तालुका धडगाव जिल्हा नंदूरबार येथील सामाहीक वन हक्क समिती (CFR) चे अध्यक्ष -वालसिंग राहसे ,सचिव - जयसिंग राहसे ,पोलीस पाटील - गौतम राहसे , सदस्य - गणेश राहसे ,सदस्य - सचिन वळवी , उपसरपंच - मांगिलाल वळवी,सदस्य - गणपत राहसे. तसेच आदी ग्रामस्थ याठिकाणी उपस्थित होते.
Post a Comment