भारतीय संविधान हे महान राष्ट्रीय ग्रंथ ! प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ

मोराणे प्रतिनिधी,प्रकाश नाईक

मोराणे:- दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित संविधान दिनानिमित्त प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ  यांनी वरील मत व्यक्त केले. पुढे बोलतांना त्यांनी संविधान हे मानव मुक्तीचा जाहीरनामा आहे, अशी आग्रही भूमिका मांडली. तसेच मतदान हे दुधारी तलवारी सारखे आहे, संविधान जनजागृती अत्यंत महत्त्वाची आहे. समाज नीतीशून्य होता कामा नये. संविधान अमर राहिले पाहिजे आणि संविधानाचा पहिली पासून ते पदवित्तर अभ्यासक्रमामध्ये समावेश केले पाहिजे अशी ही भूमिका मांडली. सर्वप्रथम संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन सामुदायिकपणे करण्यात आले. संविधान दिनानिमित्त व्याख्याते म्हणून उपस्थित असलेले प्रा. डॉ. बाजीराव पाटील यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. भारतीय संविधान हे महान ग्रंथ आहे ते जपून ठेवले पाहिजे. तरुणांनी आपल्या मनामनामध्ये भारतीय संविधानाविषयी आदर ठेवले पाहिजे तसेच संविधानातील अनेक बारीक-सारीक गोष्टींचे अनुकरण पदोपदी केले पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडली. संविधान अत्यंत अप्रतिम आहे त्याचे पालन करणारे संविधानाचे वापर करणारे अंमलबजावणी करणारे अधिकारी कर्मचारी अत्यंत सक्रिय असणे आवश्यक आहे. अशी भूमिका मांडली. संविधान दिन कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. राहुल आहेर , प्रा. डॉ. सुदाम राठोड ,प्रा. डॉ. फरिदा खान, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. राजेंद्र बैसाणे, लेखाधिकारी भाऊसाहेब वानखेडे, प्रा. सुभाष बागुल व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुदाम राठोड यांनी यशस्वीपणे सांभाळले तर उपस्थित सर्व पाहुण्यांचे आभार प्रा. डॉ. फरिदा खान यांनी मानले. 

सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार