धडगांव प्रतिनिधी:- अक्कलकुवा- अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे बिरसा फायटर्सचे अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना रावण साम्राज्य ग्रुपने पाठिंबा दिला आहे.याबाबत दिनांक ६ नोव्हेंबर २०२४ रोजी धडगाव युवकांची एक मीटींग घेण्यात आली.या मीटिंग मध्ये धडगाव तालुक्यातील युवाशक्ती रावण साम्राज्य ने निर्णय घेतला की, आदिवासी समाज रक्षक सुशीलकुमार पावरा अपक्ष उमेदवार अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला .या वेळी रावण साम्राज्याचे अध्यक्ष संजय पावरा व बिरसा फायटर्स तालुकाध्यक्ष सुनिल तडवी,आणि धडगाव तालुक्यातील असंख्य पॉवरफुल युवक उपस्थित होते.
सुशिलकुमार पावरा यांना दिवसेंदिवस अनेक सामाजिक संघटनांचा व ग्रुपचा पाठिंबा मिळत असल्यामुळे विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.रावण साम्राज्य ग्रुपने मला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. सुशिक्षित तरूणांचा मला पाठिंबा मिळत असल्याने माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.आताचे युवक हे राजकारण बदलू शकतात ,त्यामुळे आम्ही ही निवडणूक नक्कीच जिंकू, असा मला विश्वास आहे,अशी प्रतिक्रिया अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.
Post a Comment