शासकिय माध्यमिक आश्रम शाळा रोषमाळ येथे संविधान दिन साजरा

धडगाव:- दि-२६नोव्हेंबर २०२४  शासकिय माध्यमिक आश्रम रोषमाळ शाळेत संविधान दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष शाळेचे माध्यमिक शिक्षक टी. डी. भील  यांच्या हस्ते घटनेचे शिल्पकार,संविधानाचे जनक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.शाळेचे शिक्षक संजय पावरा  सरांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून भारतीय संविधानाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. शाळेतील विद्यार्थी मेथी वसावे , रोशनी वसावे ,रोहित वसावे ,साजन वळवी  मुला मुलींनी संविधान दिनानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या.शाळेतील मुख्याध्यापक  एस. डी. पावरा भारतीय संविधानाचे विविध पैलू,संकल्पना याविषयीची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. 

डॉ बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाच्या मसुदा समितीचे प्रमुख होते.त्यांच्या अथक परिश्रमाने व अभ्यासाने आपल्याला २६ नोव्हेंबर १९४९ ला राज्यघटना मिळाली म्हणजेच संविधान मिळाले व प्रत्यक्षात ते अंमलात आणले.देशात राष्ट्रीय एकात्मता राहावी,आपले हक्क आपले सरकार ,आपली अभिव्यक्ती चे जतन आपल्याला संविधानाच्या निमित्ताने मिळतात म्हणून संविधान हे आपल्यासाठी, आपल्या देशात एकता, अखंडता राहण्यासाठी महत्वाचे आहे असे आपल्या अध्यक्षीय भाषणातून माध्यमिक शिक्षक टि. डी. भील यांनी विद्यार्थ्यांना संबोधीत केले.संविधान दिनाच्या निमित्ताने शाळेतील मुला मुलींनी भारताचे संविधानाची उद्देशिका वाचण्यात आली व तिचे तंतोतंत पालन करण्याची प्रतिज्ञा केली.

    हा संविधान दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले,या कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन संजय पावरा यांनी केले तर आभार पूनम  मॅडम यांनी मानले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार