जामिया शिक्षणशास्त्र महाविद्यालयात संविधान दिवस साजरा

 अक्कलकुवा:-दिनांक 26 नोव्हेंबर 2024 मंगळवार जामिया शिक्षणशास्त्र महाविद्यालयात भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी अक्कलकुवा तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस सब इस्पेक्टर सोमनाथ पेरखेडे साहेब व पोलीस कॉन्स्टेबल कल्पेश काणेकर साहेब उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य साजीद पिंजारी यांनी आलेल्या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या प्रसंगी सोमनाथ पेरखेडे साहेब यांनी भारतीय नागरिकांसाठी संविधानाचे महत्व सांगून संविधानाने लोकांना दिलेले अधिकार व कर्तव्ये बद्दल माहिती बी. एड.च्या छात्र अध्यापकाना दिली. पोलीस कॉन्स्टेबल कल्पेश काणेकर साहेब यांनी संविधान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. या वेळी संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. मोहसीन पठाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार