खाई येथे सक्सेस मिशन स्पर्धा परीक्षा, अंतर्गत सामान्य ज्ञान व वक्तृत्व स्पर्धा संपन्न

अक्कलकुवा :- दि- ०२/११/२०२४ रोजी नंदुरबार जिल्हयातील  अक्कलकुवा तालुक्यांतील  अतिदुर्गम भागात वासल्येल्या येथील खाई या गावात  सक्सेस मिशन स्पर्धा परीक्षा, अंतर्गत सामान्य ज्ञान व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेचे उद्देश आजच्या स्पर्धात्मक युगात  स्पर्धेला कसे समोर जावे व या स्पर्धेत कसे टिकावे हा उद्देश होय.या स्पर्धेत गटानुसार 1 ते 3 नंबर स्पर्धकाची निवड करण्यात आली.त्यात सामान्य ज्ञान स्पर्धेत

प्राथमिक गट 

1 रुपसिंग दिवल्या पाडवी- प्रथम

2 प्रवीण गोरजी पाडवी- द्वितीय 

3 गिरधर पारता पाडवी -तृतीय

ज्युनिअर गट

1 बळीराम दाज्या पाडवी- प्रथम

2जगदिश दाज्या पाडवी-द्वितिय् 

3 संदीप राशा पाडवी -तृतीय

सिनिअर गट

1 विरसिंग दाज्या पाडवी - प्रथम

2 भारती  रावल्या वळवी-द्वितिय

3 रायसिंग बोद्या पाडवी -तृतीय

# वक्तृत्व स्पर्धेत#

प्राथमिक गट

प्रथम -आरुषी नरपत वसावे

ज्युनिअर गट

प्रथम- कुंता विजा वसावे

सिनिअर गट

प्रथम- संगीता तिज्या पाडवी

 स्पर्धकला बक्षीस म्हणून आवश्यक असलेले पुस्तके मान्यवरांचे हस्ते देण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक कांतीलाल पाडवी  यांनी केले तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष वनसिंग वसावे सर हे होते.तसेच प्रमुख मार्गदर्शक प्रकाश पाडवी सर, सायसिंग पाडवी सर,दूरसिंग पाडवी सर , संपत पाडवी  सरपंच खाई या मान्यवराने आजच्या स्पर्धेविषयी मार्गदर्शन केले. या स्पर्धेचे आयोजक कांतीलाल पाडवी, खेमसिंग पाडवी दुरसिंग पाडवी , शामसिंग वसावे, नरपत वसावे,रवींद्र वसावे,खोजल्या पाडवी  हे होते  या कार्यक्रमाचे सूत्र संचालक खेमसिंग पाडवी यांनी संभाळले तर आभार प्रदर्शन नरपत वसावे यांनी मांडले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार