ज्ञानेश्वर सैंदाणे त-हाडी प्रतिनिधी) :-दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी तऱ्हाडी गावात ग्रुप ग्रामपंचायत तऱ्हाडी,व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती तसेच सत्यशोधक जन आंदोलन तऱ्हाडी यांच्यावतीने संविधान दिवस साजरा करण्यात आला. ग्रुप ग्रामपंचातीत ग्रामविकास अधिकारी श्री.डी.व्ही.धाडे यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधानाचे प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. विविध धर्म संप्रदाय भाषा चालीरीती असतानाही सर्वांमध्ये एकात्मता उत्पन्न करणारे असे देशाचे संविधान आहे. या संविधानाने आपल्या अद्वितीयरीतीने लोकशाही शासन दृढमूल केले आहे म्हणून त्यांचे आपल्या जीवनात महत्त्व संविधानाने दिले आहे. बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण, शाक्त राजे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.२६/११ अतिरेकी भ्याड हल्ल्यात मुंबई येथील शहीद जवानांना व मरण पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी ग्रामसेवक डी.व्ही.धाडे. मा उपसरपंच ऊजनबाई अहिरे. सुतगिरणीचे संचालक श्री.सुदाम भलकार. मा.उपसरपंच श्री.अशोक सोनवणे श्री.तुळशीराम भामरे. श्री सुनील धनगर. श्री.मूलचंद शिरसाट. श्री भटू पवार श्री.किरण भामरे श्री नथू खोंडे. श्री विशाल करंके श्री भगवान खोंडे. श्री दाजमल अहीरे श्री गोकुळ सैंदाणे. श्री किरण अहिरे. श्री भूषण बागुल श्री प्रकाश पाटील श्री योगेश अहीरे श्री सुनील भामरे श्री प्रफुल डामरे. श्री धनराज खोंडे श्री राजू अहिरे श्री पप्पू अहिरे श्री किरण भलकार व पत्रकार ज्ञानेश्वर सैंदाणे कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.गौतम अहिरे यांच्याकडून करण्यात आले.व कार्यक्रमाचे आभार पप्पू अहिरे यांनी मानले.
Post a Comment