धरती आबा बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जन्म दिनानिमित्ताने दिल्ली जयंती उत्सव सागरी करण्यात आले. या कार्यक्रमात नंदुरबार जिल्ह्य़ातील संतोष पावरा यांना साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ‘बिरसा मुंडा अवॉर्ड 2024’ देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी श्री.जुएल ओराम जनजाती कार्य मंत्री भारत सरकार, स्टीफन जॉन-अमेरिका, जयंती बासु लोकसभा सांसद(आसाम) डॉ. बैचेन उराव प्रसिद्ध साहित्यिक नेपाळ, अशोक सारंग ‘उलगुलान एक क्रांती’ बिरसा मुंडा’ फिल्म डायरेक्टर यशोदा मुर्मू, दिल्ली -युवराज बोध, हिमाचल प्रदेश, डॉ.दयाराम वसावे इत्यादि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय’ कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान लोकांना ‘बिरसा मुंडा अवॉर्ड 2024’ देऊन सन्मानित करण्यात आले.
संतोष पावरा यांचे ‘ढोल’ ‘हेम्टू’(अतिक्रमण) राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त द्वि भाषिक कविता संग्रह आहेत. कविता गीत,कथा व विविध विषयावर वैचारिक लेख लिहित असतात. तसेच आदिवासी बोली भाषा संवर्धन एंव साहित्य परिषद, आदिवासी एकता परिषद व विद्रोही साहित्य सांस्कृतिक चळवळीत काम करीत असतात. साहित्य अकादमी आयोजित अनेक कार्यक्रमात ते आपले विचार मांडले आहेत व गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपल्या मातृभाषेला स्थान मिळवून दिले आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी पारंपरिक वाद्य व नृत्य सादर करीत क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या अभिनंदनाचा कार्यक्रमात झाला. विविध राज्यातून सांस्कृतिक नृत्य मंडळ उपस्थित होते. मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या कार्य आणि विचार अंगीकारले पाहिजे व जल जंगल जमीन रक्षणासाठी पुढे आले पाहिजे असे एकसुरी नारा दिला. आपल्या मनोगतात कवि पावरा यांनी आपली कविता ‘ आदिम इतिहास क्रांती’ म्हणत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. आदिवासी एकता परिषदेच्या कांतिलाल पेंटर यांना देखील चित्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल पुरस्कृत करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन आधुनिक इंडिया फाऊंडेशन दिल्ली व सहभागी संस्थानी केले.
-संतोष पावरा, नंदुरबार
Post a Comment