रक्तदान हेच श्रेष्ठ दान - प्राचार्य डॉ.विष्णू गुंजाळ

 

मोराणे/ प्रतिनिधी  

मोराणे :- रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे असे प्रतिपादन समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ यांनी राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात केले.

       दि.01 ऑक्टोबर 2024 रोजी समता शिक्षण संस्था पुणे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे, धुळे येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने व शासकीय रुग्णालय धुळे यांच्या संयुक्त विद्रयमाने रक्तदान शिबिर संपन्न झाले. शिबिराच्या प्रसंगी सर्वप्रथम प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ, रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. राहुल आहेर, सहाय्यक रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सुदाम राठोड यांनी रक्तदान केले.   यांच्यासह महाविद्यालयातील एकूण 25 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. 

       रक्तदान श्रेष्ठदान हे संस्कार महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यात आले ज्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले तसेच गावातील उत्साही नागरिकांनीही या रक्तदान शिबिरामध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यात प्रामुख्याने मनोहर साहेबराव बोरसे, शेवाळे शरद रामभाऊ यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

       सदरील रक्तदान शिबिर  महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.विष्णू गुंजाळ यांचे मार्गदर्शनाखाली  यशस्वी पणे संपन्न झाले. या रक्तदान शिबिरासाठी   राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ.राहुल आहेर,    महिला कार्यक्रम  अधिकारी प्रा. डॉ. फरिदा खान,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ.राठोड यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयं सेवकानी विशेष परिश्रम घेतले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार