मोराणे समाजकार्य महाविद्यालयात"वाढदिवस ग्रंथ भेट योजनेतून पुस्तक भेट उपक्रम संपन्न

 

मोराणे प्रतिनिधी / प्रकाश नाईक 

मोराणे :- समता शिक्षण संस्था पुणे, संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे, धुळे येथील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विष्णू गुंजाळ  यांनी सुरू केलेल्या नाविन्य पूर्ण उपक्रम वाढदिवसानिमित्त दोन पुस्तके ग्रंथालयास भेट द्यावे हा उपक्रम डिसेंबर 2023 पासून सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्रा.डॉ.संजीव पगारे  यांचा आज दिनांक 07/10/2024 रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने ग्रंथालयास   सोसिअल लेगि्सलेशन इन इंडिया या विषयाची  व अभ्यासक्रमाची   दोन पुस्तके प्रा. डॉ. संजीव पगारे  यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ  यांच्या कडे पुस्तके भेट म्हणून दिले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ  यांनी सदर पुस्तके विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयास प्रा. गजेंद्र जगदेव  यांच्याकडे पुस्तके सुपूर्त केली .

प्रा. डॉ. संजीव पगारे यांना  वाढदिवसाच्या निमित्ताने  प्राचार्य विष्णू गुंजाळ यांनी बुके देवून सत्कार करण्यात आला.त्यानंतर  सर्व उपस्थित  शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी प्रा. डॉ.संजीव पगारे यांना शुभेच्छा  दिल्या.  महाविद्यालयातील उपस्थित  प्राचार्य,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे  आभार मनोज ठाकरे यांनी मानले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार