गोटूसिंग वळवी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत

मोलगी:-नंदुरबार जिल्ह्याच्या अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील मुळबीज शैक्षणिक संस्था संचलित अल्फाबेट इंग्लिश मीडियम स्कूलला कार्यरत असलेले गोटूसिंग वळवी यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय व अष्टपैलू कामगिरी केल्याबद्द्ल नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमच्या वतीने दिल्या जाणाऱ्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. 

                धुळे येथे पार पडलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी खासदार स्मिता वाघ, नाशिक येथील पोलिस उपअधीक्षक आत्माराम प्रधान, परिषदेचे राष्ट्रीय सल्लागार गोपाल देवरे, सचिव जय बागुल, डॉ. ज्योती लष्करी, अध्यक्ष प्रफुल पाटील,  मंदाकिनी भाकरे, ईश्वरी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या परिषदेस चार केंद्रीय मंत्रालयाची मान्यता असून विद्यार्थ्यांमध्ये  वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे तसेच शैक्षणिक, सामाजिक, आणि पर्यावरणीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार परिषदेच्या वतीने देण्यात येत असतो. 

                गोटूसिंग वळवी यांना   आदिवासी व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी नवोपक्रम, कृतिकार्यक्रम, विविध स्पर्धेची ओळख, कौशल्यप्राप्ती, सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख अशा सर्व गुणाचे मूल्यांकन करुन हा पुरस्कार देण्यात आला. परिषदेतर्फे हा पुरस्कार देण्यात आल्याने त्यांचे शैक्षणिक, सामाजिक, पालक वर्ग, आरोग्य विभाग, वनविभाग आणि सामान्य जनतेकडून अभीनंदन केले जात आहे. गोटूसिंग वळवी यशाबद्द्ल ईश्वर वसावे, कालूसिंग वसावे, अमरसिंग वसावे, भरतसिंग वसावे, मधुकर वसावे, मनीषा वसावे, मथुरा वसावे, सरिता पाडवी, लीला पाडवी, प्राची पाडवी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी सुभेच्छा दिल्या.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार