मोलगीच्या अल्फाबेट स्कूलमध्ये गांधी जयंती साजरा

मोलगी :जीक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील मुळबीज शैक्षणिक संस्था संचलित अल्फाबेट इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून मोलगी येथील प्रज्ञा महाविद्यालयाचे प्रा. धनसिंग वसावे व प्रमुख मान्यवर प्रा. दिनेश प्रजापती तर अध्यक्षस्थानी शाळेचे प्रिंसिपल गोटूसिंग वळवी होते. 

                कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या सहाय्यक शिक्षिका मनीषा वसावे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. प्रस्तावनेत त्यांनी महात्मा गांधी यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली व आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवसाचे महत्व पटवून दिले. त्यानंतर प्रमुख अतिथी प्रा. धनसिंग वसावे यांनी महात्मा गांधी यांच्याद्वारा लिखित 'माझ्या सत्याचे प्रयोग' या आत्मचरित्रवर प्रकाश टाकत त्यांच्या प्रेरणादायक व्यक्तिमत्वावर प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले व प्रा. दिनेश प्रजापती यांनी सोप्या व सुंदर शब्दात मार्गदर्शन केले. तसेच शाळेतील सहाय्यक शिक्षिका मनीषा वसावे, प्राची पाडवी व सरीता पाडवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शाळेचे प्रिंसिपल गोटूसिंग वळवी यांनी अध्यक्षीय भाषणात विविध विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिला पाडवी यांनी तर आभार मथुरा वसावे यांनी मानले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार