तळोदा तालुक्यातील रोझवा प्लॉट येथील, दोन वर्षांच्या मुलीला बिबट्याने केले ठार


नंदुरबार:-
दि. 08 सप्टेंबर 2024 रोजी आज पहाटे 7:30 च्या दरम्यान  घराजवळ शौचालयास बसलेली मुलगी बिबट्याच्या हल्याने ठार तळोदा तालुक्यातील  रोझवा प्लॉट येथील अनुष्का जलसिंग पाडवी वय 2 वर्षे असे या मुलीचे माहिती आहे.

नंदुरबार जिल्ह्यात अती भयंकर परिस्थिती निर्माण झाली,असून या जिल्ह्यातील  आजी-माजी आमदार, खासदार, मंत्री, तसेच हजारो सामाजिक संघटना असून कोणालाच काहीही पडलेली नाहीत, प्रतिनिधींना तर आता येणाऱ्या विधानसभेसाठी तिकीट मिळविण्याची चिंता सतावत असून मुंबई साठी दौरे सुरू आहे,

 परंतु या नंदुरबार जिल्ह्यात अचानक बिबट्या कुठून आले, जे बिबट्या आहेत, ते कुठून आले, कोणत्या प्रकारचे आहेत, वनविभागाने तात्काळ शोध मोहीम हातात घेणे काळाची गरज निर्माण झाली असून त्याची जिल्ह्यातील जनतेने देखील वनविभाग आणि जिल्ह्याच्या शासन प्रशानाला जॉब विचारले पाहिजे. उदा. लोय, ता.नंदुरबार येथील, आश्रम शाळेच्या विद्यार्थ्याच्या बळी गेल्याच्या दोन दिवस बिबट्या आश्रमशाळेच्या आवारातच फिरल्याचे ठसे होते आम्ही स्वतः भेट देऊन पडताळणी केली होती, तरी देखील तिथल्या वॉचमन, चौकिदारा व व्यवस्थापक, मुख्याध्यापकाला तसेच इतर कर्मचाऱ्यांना साधी कल्पना माहिती नाहीत, पिंजरे लावून वनविभागाने लक्ष दिले असते, तर तो बिबट्या पकडला गेला असता, 

आता तोच बिबट्या लोय गावाच्या आजूबाजूला शेतात शेतकऱ्यांना फिरतांना दिसत असतो, त्यामुळे परिसरातील गावकरी व शेतकरी शेतात शेतीचे कामे करण्यासाठी घाबरत आहेत, म्हणजे  वनविभाग अजून दुसरा तिसरा बळी जाण्याची वाट  बघत आहे का?असा प्रश्न जनतेने उपस्थित केला आहे.याला कोण कोण जबाबदार आहेत? असा प्रश्न (नंदुरबार, जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ता), रोहिदास वळवी यांनी उपस्थित केला आहे.

लवकरच सर्व सामाजिक संघटना सोबत बैठक लावून वनविभागाच्या विरोधात एल्गार मोर्चा काढण्यात येणार असल्याचे रोहिदास वळवी यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार