या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे समाजात ज्या विविध प्रकारच्या शिव्या दिल्या जातात ज्यामध्ये आई व बहिनिवरून मोठ्या प्रमाणावर शिव्या दिल्या जातात,स्त्रीलिंगी शिव्या दिल्या जातात.ज्यामध्ये स्त्रियांचा मोठा अपमान केला जातो. तसेच ही गोष्ट लक्षात शाळेतील वसतिगृहातील मुलांना सोबत घेऊन डॉ.बाबसाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय येथील नगर राज बिल समर्थन मंच,धुळे येथील क्षेत्रकार्यास असणाऱ्या प्रशिक्षिनार्थिनी अभय पाटील, जितेंद्र कामडे,अर्जुन उफाडे,संजीवनी सोनवणे,नयना बैसाणे,सीमा जगताप,रोशनी वाघ,संजना पवार,कार्तिक जाधव यांनी समाजकार्य महाविद्यालयातील प्रा. डॉ. गोपाळ निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रथमतः पोस्टर प्रदर्शन करण्यात आले. त्यामध्ये शिव्या मुक्त समाज आणि इतरांचा आदर व महिलांचा सन्मान हे दर्शवले गेले होते.त्यानंतर एन. डी.पाटील विकास विद्यालय येथील विद्यार्थ्यांसोबत मिळून धुळे शहरातील देवपूर परिसरात रॅली काढण्यात आली. त्यानंतर विविध घोषणा दिली. त्यादरम्यान चौका मध्ये पथनाट्याचे प्रदर्शन करण्यात आले.त्यानंतर शाळेत व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दीपक महाले (मुख्याध्यापक एन. डी.पाटील.विकास विद्यालय), कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. विष्णू गुंजाळ (प्राचार्य डॉ.बा.आ.समाजकार्य महाविद्यालय मोराणे, धुळे ) व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते वृषभ अहिरे (सामाजिक कार्यकर्ते) कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रा. डॉ. गोपाळ निंबाळकर उपस्थित होते. या कार्यक्रमास नगर राज बिल समर्थन मंच,धुळे महानगरपालिका कार्यक्षेत्र येथील समन्वयक रामदास जगताप व नवल ठाकरे हे देखील उपस्थिती होते. प्रमुख वक्ते वृषभ अहिरे यांनी मुलांना विविध ॲक्टिव्हिटी घेऊन शिव्या मुक्त होण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख पाहुणे डॉ. विष्णू गुंजाळ यांनी देखील सगळ्या विद्यार्थ्यांना शिव्या देणे टाळले पाहिजे असे सगळ्यांना आवाहन केले त्यानंतर अध्यक्ष भाषण समाजा मध्ये आई बहिणी वरून वेगवेगळ्या प्रकारचे अपशब्द वापरून बोलले जातात ते कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी प्रत्येक नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे असे विद्यार्थ्यांना सांगितले. अशाप्रकारे शिव्या मुक्त समाज या विषयी कार्यक्रम संपन्न झाला.