अक्राणी तालुक्यातील मौजे जुगनी येथील एकुण ११ वनदावे आपल्या कार्यालयात गेल्या १ वर्षांपासून प्रलंबित आहेत. जुगनी येथील वनदावे दारांनी आपल्याकडे वारंवार पत्र व्यवहार करून वनहक्क दाव्यांबाबत कार्यवाहीसाठी अर्ज केलेले आहेत. जुगनी येथील वनहक्क दाव्यांबाबत कार्यवाहीसाठी दिनांक १९/०७/२०२४ रोजी बैठक आयोजित करण्यात आल्याचे दिनांक ०८/०७/२०२४ रोजीच्या उपविभागीय अधिकारी शहादा यांच्या पत्रान्वये दिसून येते. बैठक आयोजित करूनही सदर दाव्यांबाबत कार्यवाही प्रलंबित असल्याकारणाने दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी जुगनी येथील वनदावेदावेदार उपविभागीय अधिकारी शहादा कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत,असे दिनांक १७/०९/२०२४ रोजीच्या पत्रानुसार समजते.सदर वनहक्क दावे दारांना वारंवार आपल्या कार्यालयात हेलपाटे घालायला लावून शारिरीक व मानसिक त्रास दिला जात आहे.त्यांचे वनहक्क दावे जाणीवपूर्वक संबंधित लिपिक व अधिकारी हे निकाली काढत नाहीत, असा आरोप वनदावेदारांकडून करण्यात येत आहे.म्हणून याबाबत जाणीवपूर्वक दिरंगाई करण्याऱ्या लिपिक व अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, सदर वनदाव्यांबाबत चालू स्थितीतील माहिती वनदावेदारांना देण्यात यावी व अक्राणी तालुक्यातील जुगनी येथील एकुण ११ वनहक्क दावे तात्काळ निकाली काढण्याची कार्यवाही करण्यात यावी.हीच नम्र विनंती.अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी. असा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
आमच्या मागण्या पूर्ण करा,नाहीतर खुर्च्या खाली करा,वनदावे निकाली काढा, नाहीतर खुर्च्या खाली करा,या अधिकाऱ्यांचे करायचे काय, खाली डोक वर पाय अशा जोरदार घोषणाबाजी उपोषण कर्त्यांनी दिल्या.उपोषण कर्ते आपल्या मागणीवर ठाम राहत त्यांनी रात्रीही आमरण उपोषण सुरूच ठेवले आहे.
Post a Comment