नंदुरबार :- दिनांक 13 सप्टेंबर चे औचित्त्य साधून 16 सप्टेंबर रोजी बोराडी ता. शिरपूर जि. येथे आयोजित कार्यक्रम आदिवासी अधिकार दिवस निमित्त उपस्थित बिरसा ब्रिगेड चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक इंजि. सतिष दादा पेंदाम आदिवासी विचार मंच चे समन्वयक मोहन उंडे, बिरसा ब्रिगेड चे सातपुडा विभागीय अध्यक्ष सुंदरलाल पावरा, धुळे जिल्हाध्यक्ष जगदीश पावरा, शिरपूर तालुकाध्यक्ष भरत पावरा, यांच्या प्रमुख उपस्थिती होती. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुका मधील सेलपाणी या गावाचे जयसिंग पाडवी यांचे बिरसा ब्रिगेड नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. हे सामाजिक कार्यात नेहमी आदिवासीचा प्रश्न समस्या बद्दल आवाज उठवतात शासनाला विविध प्रकारचे निवेदन देतात. आणि आंदोलन वगैरे करून आदिवासींचे प्रश्न समस्या सोडवत असतात. त्यामुळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यांना पुढील सामाजिक कार्य नेहमी असेच कार्य करत राहा. अशा प्रकारे जनतेने सांगितले त्यानंतर पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.