धुळे:- नैतिक मूल्य, महिलांवर व अल्पवयीन मुलींवर होणारे अन्याय, अत्याचार, बलात्कार, या समस्या वरून , प्रा. डॉ. गोपाळ निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दिनांक 05/सप्टेंबर 2024 गुरुवार रोजी सद्यस्थितीत घडत असणारी सगळ्यात जटिल समस्या म्हणजे महिलांवर आणि अल्पवयीन मुलींवर होणारे अन्याय,अत्याचार,बलात्कार.
त्याच समस्येला घेऊन समता शिक्षण संस्था पुणे संचालित डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे,धुळे येथील एम. एस. डब्ल्यू भाग दोन आणि बी.एस. डब्ल्यू भाग एक च्या प्रशिक्षणार्थींनी तु.ता. खलाणे महाजन हायस्कूल येथे मुलींसाठी संरक्षणात्मक उपाययोजना या विषयावर कार्यक्रम आयोजित केला व त्याच प्रकारे मुलांसाठी सद्यस्थितीत महिलांवर आणि अल्पवयीन मुलींवर होणारा अत्याचारांवर या विषयी चर्चासत्र आयोजित करण्यात आले. तसेच नैतिक मूल्य याबद्दल देखील चर्चा करण्यात आली होती. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून
1.प्रा. डॉ. गोपाळ निंबाळकर
(नैतिक मूल्य आणि महिलांवर व अल्पवयीन मुलींवर होणारे अन्याय,अत्याचार,याविषयी चर्चा करण्यात आली.
2. प्रा. डॉ. फरिदा खान
(मुलींसाठी सुरक्षात्मक उपाययोजना)
मार्गदर्शक लाभले होते. त्याच प्रकारे नगर राज बिल मंच धुळे येथील व्यवस्थापक समन्वयक
1. रामदास भाऊ जगताप
2. नवलभाऊ ठाकरे
हे देखील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज कार्य महाविद्यालयातील विद्यार्थी अभय पाटील, जितेंद्र कामडे, अर्जुन उफाडे, सीमा जगताप, नयना बैसाणे, संजीवनी सोनवणे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.