डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे येथे, अँटी रॅगिंग समिती अंतर्गत पोस्टर प्रदर्शन कार्यक्रम संपन्न

मोराणे :- समता शिक्षण संस्था पुणे,संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे, ता. जि. धुळे येथे, अँटी रॅगिंग समिती अंतर्गत दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी रॅगिंग प्रतिबंध सप्ताहाचे समारोपिय कार्यक्रमांमध्ये अँटी रॅगिंग वर आधारित पोस्टर प्रदर्शन आयोजन करण्यात आले होते.सदर स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील जवळपास पंधरा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या पोस्टर मधील संदेश आणि अर्थ परीक्षकांना समजून सांगितला. सहभागी विद्यार्थ्यांमध्ये लक्ष्मी बागुल, रोशनी वाघ, सोज्वल वाघ, तेजस्वी पिवाल, लिलिमा महाजन, तेजस्विनी धनगर, इत्यादी विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये प्रविण्य मिळविले.

 कार्यक्रमाचे अध्यक्षीय मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांना अँटी रॅगिंग समिती कशापद्धतीने कार्य करते त्याबद्दल मार्गदर्शन केले. 12 ऑगस्ट 1८ ऑगस्ट या साप्ताहमधे महाविद्यालय वेगवेगळ्या प्रकारे कार्यक्रम घेन्यात आले होते . त्यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता ही महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे. आतापर्यंत एकही रंगिंग प्रकरण महाविद्यालय मध्ये घडले नाही आणि भविष्यात घडणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करून अध्यक्षिय समारोप करण्यात आला.

   पोस्टर प्रदर्शन स्पर्धाचे आयोजन प्रा. डॉ. सुवर्णा बर्डे व प्रा. शामसिंग वळवी यांनी केले. त्याचबरोबर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक सुद्धा प्रा.डॉ सुवर्ण बर्डे यांनी केले.पोस्टर स्पर्धेकरिता परीक्षेक म्हणून प्रा. डॉ. फरीदा खान आणि प्राध्यापक डॉ. प्रमोद भुंबे उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार