अक्कलकुवा :- तालुक्यातील अतिदुर्गम भागातील काठी गावातील सामाजिक कार्यकर्ता नेहमी सामाजिक कार्यात विविध प्रकारचे काम करणारे काठी गावातील प्रथमच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फेघेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल मित्रमंडळ, काठी गावातील नागरिकांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहे.समाजकार्य शिक्षणात माकत्या वसावे यांनी एकूण तीनशे मार्क पैकी पहिल्या पेपर मध्ये 38 मार्क मिळवले आहे. आणि दुसऱ्या पेपर मध्ये 122 मार्क मिळवून सेट परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे. तीनशे पैकी डिळशे मार्क मिळवले आहेत. त्यामुळे काठी गावातील नेहमी सामाजिक कार्यात अतिशय चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्ती म्हणून माकत्या वसावे यांना ओळखले जाते. हे काठी गावातील निंबिपाडा येथील राहिवासी आहेत. यांचे शिक्षण बी. एस. डब्ल्यू., एस. एस. डब्ल्यू., आणि सेट असे त्यांचे शिक्षण झाले आहेत. माकत्या दमण्या वसावे यांना पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. काठी गावात सेट परीक्षेत पहिल्यांदा उत्तीर्ण होणारे माकत्या वसावे हे आहेत असेही गावातील नागरिकांनी सांगितले.
Post a Comment