धडगाव:-जि.प.शाळा गौऱ्या ता.धडगाव जि.नंदुरबार येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला.यावेळी गौऱ्या येथील उपसरपंच श्री. मिनेष पराडके यांनी आदिवासी जनक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं पूजन करून सुरवात केली.शाळेत विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत आदिवासी नृत्य सादर केले . मुख्याध्यापक श्री. पंडित गवळी सरांनी आदिवासी दिवसा बद्दल माहिती दिली. शिक्षक श्री.विजय पराडके यांनी आदिवासी संस्कृती व झाडांचे महत्व सांगून त्यांची जपणूक करावी याबाबत मार्गदर्शन केले.शिक्षिका श्रीम. सुरेखा पावरा मॅडम , श्रीम. लता वळवी मॅडम व पालक उपस्थित होते.
Post a Comment