धडगांव येथे विश्व आदिवासी दिनाच्या नियोजनाची निर्णायक बैठक उत्साहात संपन्न

 

 
आपकि जय, जय आदिवासी, जोहार !

धडगाव :-  आपणांसर्वांना ज्ञात असल्याप्रमाणे धडगांव येथे ९ ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस धुमधडाक्यात साजरा करण्याचे ठरले आहे. त्यासाठी बैठकांचे सत्र सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज दि. ३ ऑग.२०र४ शनिवार रोजी रेस्ट हाऊस, जुने धडगांव येथे चौथी बैठक अतिशय खेळीमेडीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाली.आजच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननिय पोपटा वसावे होते.बैठकीला विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

.*⏭️ बैठकीत सर्वांची मते जाणुन घेत अत्यंत सकारात्मक पद्धतीने चर्चा करीत काही अंतिम निर्णय घेण्यात आले त्याला उपस्थितांनी अगदी मनमोकळेपणाने सहमती दर्शविली.*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*⏭️ दि.५ ऑगस्ट २०२४ सोमवार रोजी होणारेरक्तदान शिबिर रेकार्ड ब्रेक करण्यासाठी जास्तीत जास्त रक्तदात्यांना प्रोत्साहित करणे. शिबिरात किमान २००पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले पाहिजे असे लक्षांक ठेवण्यात आले आहे. रत्कदात्यांना मोफत टी शर्ट, गिप्ट आणि प्रमाणपत्र देण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी रक्तपेढीशी संपर्क, रक्तदात्यांना आवश्यक असलेली सामुग्री पुरविणे यासह ,ठिकाणाची बुकिंग ह्या सर्व गोष्टी माडाच्या डॉक्टरटिमने व कार्यकर्त्यांनी अंतिम टप्प्यात आणल्या आहे. रक्तदान शिबिर एस.व्ही ठकारच्या बहुउद्देशीय हॉल मध्ये होणार आहे.*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*⏭️रक्तदान शिबिराला सकाळी ८ : ०० वाजता सुरुवात होणार आहे. त्यासाठी उद्घाटक म्हणून कोणा व्यक्तिविशेषला आमंत्रण न देता हा आपला कार्यक्रम आहे याची जाणीव ठेवून मान्यवरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केली आहे. शिबिरासाठी जबाबदार कार्यकर्त्यांनी किमान पाच रक्तदाते देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*⏭️ रक्तदान शिबीराला अधिकृत सुरुवात झाल्यानंतर एक टिम शिबिराची देखरेख करेल तर अन्य टिम ९ ऑगस्ट विश्व आदिवासी दिनानिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमासाठी लागणारा आर्थिक बजेटाचा लक्षांक पूर्ण करण्यासाठी विविध विभागाला भेटी देऊन आवाहन करण्याचे ठाविण्यात आले. रक्तदान शिबिर संपल्यानंतर त्याच ठिकाणी संध्याकाळी बैठक घेऊन सर्व सहमतीने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे.*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*⏭️ राजकिय क्षेत्रातील व अन्य क्षेत्रातील मान्यवर आपल्या कामाच्या व्यस्ततेमुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नाही मात्र त्यांनी विशेष प्रतिनिधी द्वारा ९ ऑगस्टच्या विश्व आदिवासी दिनानिमित्त होणाऱ्या सर्वच कार्यक्रमासाठी आर्थिक सहयोगासह आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. ही जमेची बाजू आहे.*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*⏭️ ८ ऑगस्टला सकाळी ९ : ०० वाजेपासुन कृषि उत्पन्न बाजार समिती धडगांवच्या परीसरात वृक्ष रोपणाचा कार्यक्रम होणार असून त्यासाठी विभागाशी संबंधित जामसिंग दादा पराडके व राकेश पावरा यांचे विशेष सहकार्य राहणार आहे. त्याची तयारी त्यांनी सुरू केलेली आहे. वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाल्यानंतर भव्य अशी मोटार सायकल रॅली काढण्यात येणार आहे. त्याचा मार्ग कृषि उत्पन्न बाजार समिती पासुन सुरुवात -रोषमाळ बु. चा खर्डीपाडा -उमराणी खुर्द - एकलव्य चौक- बाबा चौक- जुने धडगांव - पालखा- मनखेडी -बिलबारपाडा -चोंदवाडे खु. _ बोरवण -धावडीपाडा -धडगांव असा राहील . असे एकमताने ठरले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

⏭️९ ऑगस्टला भव्य दिव्य अशी आदिवासी सांस्कृतिक महारॅली निघणार आहे. त्याचा मार्ग जुने तहसिल कार्यालय -सेट्रल बँक समोरून सुरूवात - एकलव्य चौक - बाबा चौक- काळुबाबा चौक ( वन विभाग कार्यालय ) पोलिस स्टेशन मागुन -खाज्या नाईक चौक-याहा मोगी चौक ( गॅस एजंसी ) - होळी चौक -भारतीय स्टेट बँक समोरून- पुन्हा बाबा चौक- येथून थेट एस.व्ही. ठकार विद्यालय ग्राऊंड येथे सभेत रूपांतर असा राहिल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

⏭️ प्रबोधन सभेसाठी विषय व वक्त्यांची निश्चिती यावर बैठकीत चर्चा झाली आहे. मात्र त्याच दिवशी सर्वत्र कार्यक्रम असल्यामुळे वक्त्यांची नावे निश्चित होऊ शकली नाही. तरीही वाहरू सोनवणे, नामदेव पटले यांची शी संपर्क सुरू असून अन्य वक्ते व आदिवासी स्फुर्ती गीते गाणारे आदिवासी गायक यांच्याशी संपर्क साधुन त्यांची नावे निश्चित करण्याचे कार्य लवकरच पूर्ण करावे असे ठरले.*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*⏭️९ ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी प्रचारार्थ ऑडियो क्लिप, प्रचार वाहन, झेंडे, बॅनर यावरही सकारात्मक चर्चा झाली. प्रचाराची ऑडियो क्लिप लवकर तयार करण्याचे ठरले.*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*⏭️ एकूणच बैठक अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. बैठकीला मोठया संख्येने मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व ज्ञात अज्ञातांचे आभार !*

              *धन्यवाद !*

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार