मोराणे :- समता शिक्षण संस्था पुणे, संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे येथे दि. 06/08/2024 रोजी आजीवन कक्षातील विद्यार्थ्यांसाठी दुपारी 2.00 वा दस्तऐवज प्रक्रियेविषयी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम एम. एस. डब्ल्यू. द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. विष्णू गुंजाळ हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. गोपाळ निंबाळकर होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. मेघावी मेश्राम यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मेघावी मेश्राम यांनी केले.त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ. विष्णू गुंजाळ यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन एम. एस. डब्ल्यू. च्या द्वितीय वर्षातील प्रशिक्षणार्थिंना दस्तऐवज प्रक्रिया विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आपण काम करत असताना केलेले कामाचे पुरावा म्हणून लेखी स्वरूपात नोंदणी ठेवली पाहिजे. आणि विविध शासकीय संस्था व स्वयंसेवी संस्था, प्रकल्पा मध्ये काम करत असताना कामाची नोंदणी ठेवावी लागते असेही म्हणाले. आपण कोणत्याही ठिकाणी काम केले असेल त्याचे प्रमाणपत्र आपल्याला दुसऱ्या ठिकाणी नोकरीसाठी जातांना हे प्रमाणपत्र कामात येते. तसेच गावाची प्रोफाइल कशी बनवायची त्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नॉक समिती बद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. गोपाळ निंबाळकर यांनी दस्तऐवजीकरण कसे करतात त्या बद्दल विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. आपण केलेले कामाची माहिती लेखी स्वरूपात नोंदणी ठेवू शकतो. विविध कार्यालयात वेगवेगळ्या प्रकारचे अहवाल, बिल, रजिस्टर, पोस्टर, फोटो, व्हिडीओ, खाते वही असतात नोंदणी ठेवण्यासाठी तीस वर्षा पर्यंत रेकॉर्ड म्हणून माहिती आपल्याला ठेवता येते. दस्तऐवजीकरण करण्याआधी तयारी, दस्तऐवज कुणासाठी - प्रकल्पातील व्यक्तीसाठी, प्रकल्पाबाहेरील व्यक्तीसाठी, दस्तऐवजीकरण का?, आपली जबाबदारी असलेल्या कामाच्या स्वतःच्या नोंदी लिहून ठेवणे. दस्तऐवजचे प्रकार- श्राव्य, दृष्य स्वरूप, लिखित स्वरूपात, आणि छापील स्वरूपातील, भिंतीपत्रके, कटपुतली प्रकार, शॉल वर फोटो दाखवून लोकांना समजावून सांगता येते. इत्यादी प्रकारची विविध प्रकारची माहिती विद्यार्थ्यांना प्रा. डॉ. गोपाळ निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता पवार यांनी केले. आभारप्रदर्शन अरुणा मराठे यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. विष्णू गुंजाळ, प्रा. डॉ. गोपाळ निंबाळकर, प्रा. मेघावी मेश्राम, आणि एम एस. डब्ल्यू. द्वितीय वर्षातील प्रशिक्षणार्थी आदी उपस्थित होते.
Post a Comment